मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरैशी आणि तिचा भाऊ साकिब सलीम यांनी आता मुंबईत सेटल होण्याची तयारी केली आहे. अलीकडेच या दोघांनी मुंबईत एक नवीन फ्लॅट खरेदी केला आहे. नवीन फ्लॅट खरेदी केल्याच्या निमित्ताने हुमा आणि साकिबने एक जंगी पार्टी आयोजित केली होती. या पार्टीत बॉलिवूडमधील अनेक स्टार्स आणि दोघांचे जवळचे मित्र सहभागी झाले होते.
बॉबी देओल, वरुण धवन, एकता कपूर, सोहेल खान, वाणी कपूर, विकास बहल, सुधीर मिश्रा, कृतिका, मुस्ताक शेख, अपूर्व लाखिया, केन घोषसह बरेचे सेलेब्स हुमाच्या नवीन फ्लॅटमध्ये जमले होते.
हुमा आणि साकिबने मुंबईतील अंधेरी परिसरात हे घर खरेदी केले आहे. यापूर्वी हे दोघेही याच भागात 5 बीएचके फ्लॅटमध्ये भाड्याने राहात होते.
यावेळी साकिबने आपल्या वाढदिवससुद्धा साजरा केला. 8 एप्रिल रोजी साकिब 26 वर्षांचा झाला. साकिब अभिनेता असून 2011मध्ये आलेल्या 'मुझसे फ्रेंडशिप करोगे' या सिनेमाद्वारे त्याने आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. त्यानंतर तो 2013 मध्ये रिलीज झालेल्या 'मेरे डॅड की मारुती' आणि 'बॉम्बे टॉकिज' या सिनेमात झळकला. आता आगामी हवा हवाई या सिनेमात त्याची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.
हुमाविषयी सांगायचे झाल्यास ती बॉलिवूडमध्ये स्वतःचे बस्तान बसवतेय. एक थी डायन, शॉर्ट्स, डी डे, डेढ इश्किया या सिनेमात तिने अभिनय केला आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा हुमाच्या घरी आयोजित पार्टीत सहभागी झालेल्या स्टार्सची खास छायाचित्रे...
(फोटा- योगेन शाह)