आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिअल लाईफमध्ये वसीम अक्रमची प्रेयसी होती हुमैमा मलिक, पाहा Pix

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(पाकिस्तानी अभिनेत्री आणि मॉडेल हुमैमा मलिक)

इमरान हाश्मीच्या 'राजा नटवरलाल' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेणारी पाकिस्तानी अभिनेत्री आणि मॉडेल हुमैमा मलिक पाकिस्तानी फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध नाव आहे. अलीकडेच हुमैमाने आपल्या खासगी आयुष्याविषयी खुलासा करताना सांगितले होते, की तिचे पाकिस्तानचे माजी क्रिकेटर वसीम अक्रमसह अफेअर होते.
हुमैमाने सांगितले, की वयाच्या 23 वर्षी तिचा वसीम अक्रमवर जीव जडला होता. त्यावेळी अक्रमचे वय 45 वर्षे होते. त्याकाळात आम्ही बरेच दिवस डेटिंग केले होते. आजही आम्ही दोघे चांगले मित्र असल्याचे हुमैमाने सांगितले. वयाच्या 18 व्या वर्षी हुमैमाचे लग्न झाले होते. मात्र लग्नाच्या दोन वर्षांतच तिचा घटस्फोट झाला होता.
हुमैमा पुढे म्हणाली, की वसीम तिला बोनम पॉईंट म्हणायचे. मी त्यांच्या आयुष्यात असल्याने ते स्वतःला भाग्यशाली समजत होते.
शुक्रवारी रिलीज झालेल्या 'राजा नटवरलाल' या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये आपले नशीब आजमावणारी 25 वर्षीय हुमैमा एक टीव्ही पर्सनॅलिटीच्या रुपात पाकिस्तानात प्रसिद्ध आहे. ती पाकिस्तानातील महागड्या अभिनेत्रींपैकी एक असल्याचे सांगितले जाते.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा हुमैमाची खास छायाचित्रे...

(नोट : हुमैमाची ही छायाचित्रे इंटरनेटवरील विविध माध्यमांतून घेण्यात आली आहेत.)