आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PIXमध्ये पाहा, 'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया'च्या प्रमोशनल इवेंटमधील आलियाचे वेगवेगळे अंदाज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेत्री आलिया भट्ट
मुंबई - अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री आलिया भट्ट सध्या आपल्या आगामी 'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया' या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहेत. या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये ते कोणतीही कसर शिल्लक सोडत नाहीयेत. छोट्या पडद्यापासून ते वेगवेगळ्या पत्रकार परिषदांमध्ये हे दोघे आपल्या सिनेमाचे प्रमोशन करत आहेत.
अलीकडेच हे दोघे यानिमित्ताने एका पत्रकार परिषदेत पोहोचले. यावेळी आलिया हॉल्टर मॅक्सी ड्रेसमध्ये यावेळी दिसली. तिची सँडलसुद्धा खूप स्टायलिश होती. तिने उजव्या हाताच्या बोटात एक रिंग घातली होती. ही रिंग गोल्ड आणि प्लॅटिनमची होती. तर दुसरीकडे वरुण टॉमी हिल्फिजर शर्ट आणि पर्पल कलरच्या जीन्समध्ये दिसला. या दोघांनीही आपल्या सिनेमाविषयी पत्रकारांशी गप्पा मारल्या. यावेळी आलियाचे वेगवेगळे हावभाव बघायला मिळाले.
'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया' या सिनेमात वरुण धवनच्या पात्राचे नाव हम्प्टी शर्मा आहे. ती क्रिकेटचा चाहता आहे. तर आलिया भट्ट काव्या प्रताप नावाच्या तरुणीच्या भूमिकेत झळकणार आहे. ती करीना कपूरची मोठी चाहती असते. हा सिनेमा चंदीगडच्या पार्श्वभूमीवर आधारित लव्ह स्टोरी आहे. करण जोहर या सिनेमाचा निर्माता असून शशांक खेतन दिग्दर्शक आहेत. येत्या 11 जुलै रोजी हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर दाखल होत आहे.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला या पत्रकार परिषदेत क्लिक झालेले आलिया आणि वरुणचे वेगवेगळे हावभाव दाखवत आहोत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा आलिया आणि वरुणच्या Looksची छायाचित्रे...