आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Humpty Sharma Ki Dulhania\'s First Trailer Launch

TRAILER OUT: पाहा आलिया-वरुणच्या \'हम्प्टी शर्मा...\'ची खास झलक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वरुण धवन आपल्या 'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया' या आगामी सिनेमासाठी पूर्णत: बदलला आहे. नवीन लूक आणि कॉलेज स्टुडेंटसारख्या अंदाजात तो या सिनेमात दिसणार आहे.
करण जोहरच्या प्रॉडक्शन हाऊसखाली बनत असलेल्या 'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया'मध्ये वरुण आणि त्याची दुल्हन अर्थातच आलिया यांचा लूक पूर्णत: बदलेला दिसणार आहे.
'हम्प्टी शर्मा...'चा ऑफिशिअल ट्रेलर लाँच झाला आहे. ट्रेलरमध्ये वरुण धवनचा लूक त्याच्या मागील सिनेमांपेक्षा खूप वेगळा आहे. तसेच, आलियासुध्दा आकर्षक लूकमध्ये दिसून येत आहे.
सिनेमाचा ट्रेलर बघून तुम्हाला करण जोहरच्या सिनेमाचा आनंद घेता येईल. ट्रेलरच्या पहिल्याच सीनमध्ये वरुण एक स्वप्न बघतो. त्यामध्ये तो आलियासोबत बसलेला आहे. बॅकग्राऊंडमध्ये 'मुड-मुड के ना देख मुड-मुड के...' या गाण्याचे बोल ऐकायला मिळतील.
त्यानंतर पूर्ण ट्रेलरमध्ये करण जोहरच्या मागील एका सिनेमाची एक झलक बघायला मिळते. एक पूर्ण मनोरंजन पॅकेजची झलकसुध्दा पाहायला मिळते.
सिनेमाच्या ट्रेलरमध्ये आलियालासुध्दा एका बिनधास्त तरुणीच्या लूकमध्ये दाखवण्यात आले आहे. ती आयुष्य आपल्या मनाप्रमाणे जगते. आलियाचे ट्रेलरमधील पात्र 'कभी खुशी कभी गम'मधील करीनाच्या पात्राची आठवण करून देते. आलिया एका सीनमध्ये म्हणते, 'मैं शादी करूंगी तो करीना वाला डिजायनर लहंगा पहनकर...' यावरूनसुध्दा करीनाच्या पात्राचे कनेक्शन वाटते.
सिनेमा दिल्लीच्या विविध लोकेशन्सवर शुट करण्यात आला आहे. सिनेमाचा ट्रेलर जसा फिल्मी फॅशनने सुरू होतो त्याच अंदाजात एंडसुध्दा होतो. ट्रेलरच्या शेवटी वरुण डोळ्या पाणी आणून करण जोहरचा 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' सिनेमाचा एक सीन बघत आहे.
सिनेमाचा ट्रेलर बघून असेच जाणवते, की करण जोहर आपल्या जून्या सिनेमांचे यश पुन्हा दाखवण्यासाठी तयार आहेत.
आता 'स्टुडेंट ऑफ द इअर'नंतर प्रेक्षक आलिया आणि वरुण यांच्या जोडीला कितपत स्वीकार करतात. हा सिनेमा 11 जुलै रोजी थिएटरमध्ये झळकणार आहे. याचे दिग्दर्शन सुशांत खैतानने केले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून बघा सिनेमाचे काही सीन्स आणि सिनेमाचा ट्रेलर...