आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Humpty Sharma Ki Dulhania's Kissing Seans Sensor Board Want Delete

सेन्सॉर बोर्डाने हटवले ‘हम्प्टी शर्मा की..’मधील किसींग सीन्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अलीकडेच सेन्सॉर बोर्डाने सिनेमातील मजकूर व दृश्यांविषयी खरबरदारी घेणे सुरू केले आहे. नवीन सरकारचा दृष्टिकोन लक्षात घेता बोर्डाने करण जोहरच्या बॅनरचा ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’ या नवीन सिनेमाला प्रमाणपत्र देताना त्यातील एक किसचे सीन्स हटवण्यास सांगितले आहे. निर्मातांकडून बर्‍याचशा सिनेमांमध्ये अशी दृश्ये कोणतीही सबब न सांगता पास करण्यात आली असल्याचा तर्क लावण्यात आला. त्यानंतर चुंबन घेतलेले हे क्लोज-अप दृश्य हटवण्यात आले आणि लॉन्ग शॉटने घेतलेले एक दृश्य ठेवण्यात आले. बोर्डाकडून आपल्या प्रादेशिक विभागामध्ये असलेल्या शाखांना सूचना करण्यात आल्या आहेत की, प्रादेशिक सिनेमामध्ये प्रौढ मजकुरावर आणि दृश्यांवर नियंत्रण केले जावे. तथापि, बोर्डाची पुढची वाटचाल सरकारच्या औपचारिक धोरणांवर अवलंबून असणार आहे. या सिनेमात आलिया भट्ट आणि वरुण धवन यांची मुख्य भूमिका आहे. ‘बालिका वधू’ फेम सिद्धार्थ शुक्लादेखील सिनेमात झळकणार आहे.