आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'मेंदूसाठी हानिकारक आहे साजिदचा सिनेमा', अशाप्रकारे उडवली जातेय 'हमशकल्स'ची खिल्ली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेतन भगतचे ट्विट
मुंबई - ''एखादाच धाडसी असेल, जो 'हमशकल्स'ला हाऊसफुल करेल''. मागील काही दिवसांपासून अशाप्रकारे सोशल नेटवर्किंग साइट्सवर 'हमशकल्स' आणि साजिद खानची खिल्ली उडवली जातेय. विशेष म्हणजे साजिदच्या या सिनेमाला काही समीक्षकांनी शुन्य स्टारसुद्धा दिले आहेत. तरीदेखील या सिनेमाने पहिल्या आठवड्यात (तीन दिवस) 40 कोटींपेक्षा जास्तचा व्यवसाय केला. मात्र सिनेमा बघितल्यानंतर निराशा झालेल्या प्रेक्षकांनी सिनेमाविषयीची आपली मते ट्विटरच्या माध्यमातून जाहीर केली आहेत.
ट्विटरवर साजिद खान आणि 'हमशकल्स'ची खिल्ली उडवण्यात प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांचाही क्रमांक लागतो. चेतन यांनी ट्विट केले, ''सीआयडी घटनास्थळी दाखल झाली. मृतदेहाच्या खिशात 'हमशकल्स'चे तिकिट होते. एसीपीने लगेचच हे आत्महत्या प्रकरण असल्याचे जाहीर केले.'' याशिवाय चेतन भगत यांनी म्हटले, की 'हमशकल्स'मधून जी कमाई होईल त्यातून साजिदने मानसिक उपचार करुन घ्यावेत.
'हमशकल्स'ची ट्विटरवर पाहा कशी उडवली जातेय खिल्ली...
1.. 'हमशकल्स' हा एवढा बेकार सिनेमा आहे, की ज्यांनी हा सिनेमा बघितला नाही ते लोकदेखील पैसे परत मागत आहेत. @Ra_Bies
2.. सिनेमाच्या सुरुवातीला सुचना देण्यात यावी, 'मेंदूसाठी हानिकारक आहे साजिदचा सिनेमा'.
@coolfunnytshirts
3.. मोदींनी आयएनएस विक्रमादित्यवर 'हमशकल्स'ची डीव्हीडी पाठवली आहे, जी पाकिस्तानवर टाकण्यात येईल. @beyond_mp_666
पुढील स्लाईड्समध्ये वाचा असेच काही मजेशीर ट्विट्स...