आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Friday Release: सैफ-रितेश-राम बनले \'हमशकल्स\', पाहा सिनेमाचे PIX

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्रात राम कपूर, सैफ अली खान आणि रितेश देशमुख)
मुंबई - साजिद खान दिग्दर्शित 'हमशकल्स' हा सिनेमा उद्या (20 जून) रिलीज होणार आहे. या सिनेमात सैफ अली खान, रितेश देशमुख आणि राम कपूर एकत्र झळकणार आहेत. तर तमन्ना भाटिया, ईशा गुप्ता आणि बिपाशा बसू यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका या सिनेमात आहेत. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरावा यासाठी सिनेमातील स्टारकास्ट कोणतीही कसर शिल्लक सोडताना दिसत नाहीये.
या स्टार्सनी छोट्या पडद्यावरील 'एन्टरटेन्मेंट के लिए कुछ भी करेगा', 'डान्स इंडिया डान्स' आणि कपिल शर्माच्या 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' या रिअॅलिटी शोमध्ये सिनेमाचे जोरदार प्रमोशन केले. आता या स्टार्सची मेहनत फळाला येणार का हे तर सिनेमा रिलीज झाल्यानंतरच स्पष्ट होईल.
तसं पाहता या सिनेमाशी निगडीत एक वादसुद्धा समोर आला आहे. या सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारणारी बिपाशा बसू प्रमोशनवेळी एकदाही दिसली नाही. याविषयी बिपाशाने ट्विट केले, की या सिनेमात काम करुन ती आनंदी नाहीये, त्यामुळे प्रमोशनमध्ये सहभागी होत नाहीये.
'हमशकल्स'मध्ये सैफ, रितेश आणि राम कपूर यांनी तिहेरी भूमिका साकारल्या आहेत. हिमेश रेशमिया या सिनेमाचे संगीतकार असून वाशू भगनानी यांनी निर्मात्याची भूमिका पेलली आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा 'हमशकल्स'ची निवडक छायाचित्रे...