आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PICS: 'हमशकल्स'ने जमवला 50 कोटींचा गल्ला, साजिदने टीमसह केली सक्सेस पार्टी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेता राम कपूर, अभिनेत्री ईशा गुप्ता, दिग्दर्शक साजिद खान आणि रितेश देशमुख
मुंबई: 'हमशकल्स' गेल्या शुक्रवारी (20 जून) रिलीज झाला. सिनेमा जसा थिएटरमध्ये झळकला तोच समीक्षक आणि प्रेक्षकांनी सिनेमाच्या संकल्पनेवर आणि साजिद खानच्या दिग्दर्शनावर टिका करण्यास सुरूवात केली. सोशल साइट्सवर या सिनेमाचे अफलातून जोक्स पाहायला मिळाले. एवढी टिका होऊनदेखील सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धमाकेदार प्रदर्शन केले. सिनेमाने पहिल्या दिवशी 40 कोटींपेक्षा जास्त कमाई केली. यानिमित्त साजिद खानने मंगळवारी (24 जून) कास्टसह सक्सेस पार्टी केली.
'हमशकल्स'च्या सक्सेस पार्टीमध्ये साजिद खानसह सिनेमाचा निर्माता वासु भगनानी, अभिनेत्री ईशा गुप्ता, अभिनेता रितेश देशमुख आणि राम कपूर यांची उपस्थिती होती. मात्र या पार्टीत बिपाशा आणि तमन्ना दिसल्या नाही. सिनेमाच्या सक्सेसने सर्व स्टार्स खूप आनंदी दिसले. सिनेमाचे बजेट जवळपास 90 कोटी रुपये होते आणि आतापर्यंत सिनेमाने 50 कोटींचा गल्ला जमवला आहे.
'हमशकल्स'मध्ये सैफ अली खान, रितेश देशमुख आणि राम कपूर यांच्या ट्रिपल भूमिका आहे. सिनेमा 1982मध्ये आलेल्या 'अंगूर'पासून प्रेरित आहे. 'अंगूर' व्हिलियम शेक्सपिअरच्या 'कॉमेडी ऑफ एरर्स'वर आधारित होता.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि पाहा 'हमशकल्स'च्या सक्सेस पार्टीची छायाचित्रे...