आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hyderabadi Biryani & Haleem On Salman Khan\'s Sister Wedding Dinner Party

अर्पिताच्या लग्नात पाहुण्यांना वाढले जाणार \'हलीम\' आणि \'पत्थर का गोश्त\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(हैदराबादच्या या 'फलकनुमा पॅलेस'मध्ये होणार आहे अर्पिताचे लग्न)
मुंबई: बॉलिवूड स्टार सलमान खानची बहीण अर्पिता खानचे उद्या लग्न आहे. मंगळवारी (18 नोव्हेंबर) अर्पिताचे हैदराबादमध्ये लग्न शाही थाटात होणार आहे. तिच्या लग्नाची जोरदार तयारी चालू आहे. या लग्नात सामील होणा-या पाहुण्यांसाठी 'हैदराबादी बिर्याणी', 'हलीम' आणि 'पत्थर का गोश्त' (दगडावर शिजवले जाणारे गोश्त)सारख्या प्रसिध्द दाक्षिणात्य पदार्थांचा सामावेश असणार आहे.
आर्पिताचे लग्न जून्या हैदराबादच्या फलकनुमा पॅलेसमध्ये होणार आहे. या समारंभात बॉलिवूड आणि टॉलिवूडचे अनेक प्रसिध्द कलाकार सामील होणार असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या पॅलेसला सजवले जात आहे. सूत्राच्या सांगण्यानुसार, 'संपूर्ण हॉटेल 18 आणि 19 नोव्हेंबरसाठी बुक करण्यात आले आहे.'
सूत्रांच्या सांगण्याप्रमाणे, 'कलाकरांनी भरलेल्या या ग्रँड इव्हेंटची तयारी पाहून खान कुटुंबीय हैदराबादी पदार्थांचादेखील समावेश करणार असल्याचे कळते. लग्न सोहळ्याच्या जोरदार तयारीकडे पाहून स्वादीष्ट पदार्थांदेखील मेन्यूमध्ये अॅड करण्यात येणार आहेत. परंतु 18 नोव्हेंबरला होणा-या डिनर पार्टीसाठी हैदराबादी पदार्थांना पसंती देण्यात येणार आहे. त्यामध्ये 'हैदराबादी बिर्याणी' आणि 'पत्थर का गोश्त'चा विशेष सामावेश आहे.'
'कच्चे गोश्त की बिर्याणी' आणि 'हलीम'चा सामावेश
हैदराबादचा सातवा निजाम महबूब अली खानचे महल फलकनुमाला 2010मध्ये ताज ग्रुप ऑफ हॉटेल्सने एका लग्जरी हॉटेलमध्ये रुपांतरीत केले. खान कुटुंबाने या हॉटेल मॅनेजमेंटला अर्पिताच्या लग्नासाठी विशेषत: 'कच्चे गोश्त की बिर्याणी' आणि 'हलीम' या पदार्थांचा डिनरच्या मेन्यूमध्ये सामावेश करण्यास सांगितले आहे.
सुरक्षेचे विशेष व्यवस्थापन
सलीम खान यांची सर्वात छोट्या मुलगी अर्पितीच्या लग्नात सामील होणी-या व्हीआयपी पाहुण्यांच्या सुरक्षेसाठी विशेष व्यवस्थापन करण्यात आले आहे. या समारंभात ज्यांना आमंत्रण देण्यात आले त्यांनाच सामील होण्याची परवानगी आहे. याविषयी हैदराबादच्या दक्षिण विभागाटे पोलिस उपायुक्त व्ही. सत्यनारायण यांच्याशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी सांगितले, की आम्हाला हॉटेलच्या व्यवस्थापनेच्या सुरक्षा करण्याची विनंती करण्यात आली आहे. या लग्नात जवळपास 200 लोक सामील होत असल्याचे सांगितले जाते आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा फलकनुमा पॅलेसची काही छायाचित्रे...