मुंबई: यावर्षी सर्वात मोठा
बॉक्स ऑफिस वीकेंड 2 ऑक्टोबरला राहणार आहे. पाच दिवसांच्या या वीकेंडमध्ये हृतिक रोशन,
कतरिना कैफ अभिनीत 'बँग बँग' आणि शाहिद कपूर, श्रध्दा कपूर अभिनीत 'हैदर' हे बहुप्रतिक्षीत सिनेमे रिलीज होत आहे. सिध्दार्थ आनंद दिग्दर्शित 'बँग बँग' या कमर्शिअल सिनेमापुढे विशाल भारव्दाज दिग्दर्शित 'हैदर' फिका-फिका दिसत असल्याचे बोलले जात आहे. मात्र, शाहिद हे मान्य करत नाही.
तो म्हणाला, 'आम्हाला सुरुवातीपासूनच माहित होते, की आमचा सिनेमा 'बँग बँग'सोबत रिलीज होणार आहे. मला अपेक्षा आहे, की 'बँग बँग' चांगले प्रदर्शन करेल. मला हृतिकचे काम आवडते. सिनेमासुध्दा चांगला असल्याचे दिसून येत आहे. पण मी माझ्या सिनेमाकडून ब-याच अपेक्षा बाळगल्या आहेत. 'हैदर'मध्ये जे लोकांना मिळणार आहे, ते 'बँग बँग' देऊ शकणार नाही. तसेच. जे 'बँग बँग' देईल ते 'हैदर' देऊ शकणार नाही.'
शाहिदच्या सांगण्यानुसार, लोकांसमोर दोन विविध पर्याय आहेत. त्यांनी ते निवडावे. त्याने पुढे सांगितले, 'हा पाच आठवड्यांचा वीकेंड असणार आहे. जो वर्षभरातून कधी-कधीच येतो. दोन सिनेमांसाठी तीन दिवसांचा वीकेंडच पुरेसा असतो. आम्ही हैदर खूप मर्यादीत बजेटमध्ये बनवला आहे. लोकांना चांगले सिनेमे पाहण्याची इच्छा असते, त्यामुळे काही चिंता नाहीये.'