आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • I Have Pakistani Blood In My Veins Says Sonam Kapoor

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोनम म्हणाली, \'माझ्या शरीरात पाकिस्तानी रक्त, कराचीला जाण्यास मी आतूर\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अटारी बॉर्डरवर क्लिक झालेली सोनम कपूरची छायाचित्रे.. बीएसएफच्या रिट्रीट सेरेमनीत सहभागी झाल्यानंतर सोनम तिचा को-स्टार फवाद खानसह सुवर्ण मंदिरात गेली होती.)

अटारी (पंजाब)- बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर आज रिलीज झालेल्या 'खुबसूरत' या सिनेमाच्या प्रमोशनसाठी नुकतीच अटारी बॉर्डरवर पोहोचली होती. येथे बीएसएफच्या रिट्रीट सेरेमनीत सोनम तिचा सहकलाकार फवाद खान आणि किरण खेर यांच्यासमवेत सहभागी झाली होती.
येथे पत्रकारांशी बोलताना सोनम म्हणाली, ''माझे दोन्ही आजोबा (आईचे वडील आणि वडिलांचे वडील) हे पाकिस्तानच्या पेशावरमधील रहिवासी होते, त्यामुळे पाकिस्तानला जायला मला नक्की आवडेल. माझ्या शरीरामध्ये एकप्रकारे पाकिस्तानी रक्तच आहे. पाकिस्तानमधील सिंध व पेशावरमध्ये माझे पूर्वज राहिले आहेत. कराचीमध्ये जाऊन मला मोठी खरेदी करायची इच्छा आहे."
सोनम पुढे म्हणाली, ''मी सीमेवरील आपल्या जवानांना पाकिस्तानच्या हद्दीत जाऊ देण्याची विचारणा केली. मात्र माझ्याकडे व्हिसा नसल्याने त्यांनी मला जाऊ दिले नाही. भारत-पाक सीमेवर दोन्ही देशांमधील सैनिक एकमेकांशी हस्तांदोलन करताना दिसतात. दोन्ही देशांसाठी खरोखरच ही चांगली गोष्ट आहे. ''
फवाद खान म्हणाला, "मी पाकिस्तानातून आहे. सीमेवरील वातावरण व देशातील अंतर्गत वातावरणामध्ये खूपच बदल आहे. सीमेवर आल्यानंतर मला दोन्ही देशामधील नागरिकांचे संबंध पाहायला मिळाले. दोन्ही देशांमधील नागरिकांचे संबंध हे खरोखरच खूप चांगले आहेत. सिनेसृष्टीमुळे दोन्ही देशांमधील संबंध दृढ होण्यासाठी ही नक्कीच चांगली वेळ आहे."
यावेळी सोनम आणि फवाद यांच्यासोबत अभिनेत्री किरण खेरसुद्धा येथे उपस्थित होत्या. पत्रकार सोनम आणि फवादला प्रश्न विचारण्यात बिझी असल्याचे बघून, अरे मीसुद्धा इथे हजर आहे, मलाही प्रश्न विचारा, असे किरण खेर पत्रकारांना गमतीने म्हणाल्या. आपल्या सहकलाकारांसोबत मलासुद्धा पाकिस्तानात जायला आवडेल, असेही किरण खेर यांनी म्हटले.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा अटारी बॉर्डरवर सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने पोहोचलेल्या सोनम, फवाद आणि किरण खेर यांची खास छायाचित्रे...
सर्व फोटोः हरविंदर संधू