आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • I Was Sexually Abused As A Child: Kalki Koechlin

कल्किचा धक्कादायक खुलासा, \'बालपणी झाले होते माझे लैंगिक शोषण\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - देव डी, जिंदगी ना मिलेगी दोबारा, एक थी डायन आणि ये जवानी है दिवानी या सिनेमांमध्ये आपल्या अभिनयचा ठसा उमटवणारी अभिनेत्री कल्कि कोचलिनने एक खळबळजनक खुलासा केला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना कल्किने खुलासा केला, की बालपणी तिचे लैंगिक शोषण झाले होते.
वाहिनीशी बोलताना कल्कि म्हणाली, की मी कधीही सार्वजनिकरित्या या विषयावर बोलू इच्छित नाही. त्या घटनेविषयी काहीही न सांगता कल्कि म्हणाली, ''मी कधीही याविषयावर बोलणे पसंत करत नाही, तुम्ही कधीही माझ्या तोंडून याविषयी काहीही ऐकले नाही. मी दीर्घ काळापासून हे दुखणे सोबत घेऊन जगत आहे. आपल्यापैकी ब-याच लोकांसोबत अशाप्रकारच्या घटना घडल्या आहेत. माझी एक मैत्रीणसुद्धा लैगिंक शोषणाला बळी पडली आहे.''
कल्किने सांगितले, की भारतात 53 टक्के लहान मुले यौन शोषणाचे शिकार झाले आहेत. ती पुढे म्हणाली, ''माझ्या मते, याविषयावर बोलण्यासाठी पब्लिक प्लॅटफॉर्म एकमेव माध्यम नाहीये. यासाठी मौन तोडणे गरजेचे आहे. आपल्याला या विषयावर बोलणे गरजेचे आहे.''
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या कल्कि आणखी काय म्हणाली...