आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिया खान मृत्यूप्रकरणातील सत्य समोर यायला हवे: हायकोर्ट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: बॉम्बे हायकोर्टाने दिवंगत अभिनेत्री जिया खानच्या मृत्यू प्रकरणामध्ये पूर्ण तपासणी करून सत्यता जाणून घेण्याची मागणी केली आहे. कोर्टाने सरकारी वकिलांना सांगितले, की 3 जुलैपर्यंत या प्रकरणाविषयी सर्व माहिती हाती आली पाहिजे.
कोर्ट मंगळवारी (2 जुलै) जियाची आई राबिया खान यांच्या याचिकेवर सुनावणी करत आहे. राबिया यांनी याचिकेमध्ये आरोप लावला होता, की त्यांच्या मुलीचा खून झाला आहे.
त्यांनी या प्रकरणाची तपासणी मुंबई पोलिसांकडून घेऊन सीबीआयकडे देण्याची मागणी केली होती. यावर न्यायाधीश व्हीएम कनाडे आणि पीडी कोडे यांच्या बेंचने सरकारी वकिल पूर्णिमा कंथारिया यांना विचारले, 'जिया खानने आत्महत्या केली की तिची हत्या झाली आहे? वर्षभरापूर्वी जियाचा घरात मृतदेह आढळला होता त्यापूर्वी तिने मद्यपान केले होते का?'