आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Iifa PC: Shahid Said, ‘Rithik Best Dancer In Industry’

iifa प्रेस कॉन्फ्रेंसः शाहिद म्हणाला, 'हृतिक इंडस्ट्रीचा उत्कृष्ट डान्सर'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आयफा (इटरनॅशनल इंडियन फिल्म अ‍ॅकॅडमी)ने मुबंईच्या पीव्हीआर सिनेप्लेक्समध्ये एक पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेत बॉलिवूड स्टार्स हृतिक रोशन, शाहिद कपूर आणि फरहान अख्तरसुध्दा सामील झाले होते. या निमित्तावर या तिन्ही स्टार्सनी आपल्या फिल्मी करिअरचा अनुभव शेअर केला.
शाहिद कपूरने सांगितले, 'मी 'कोई मिल गया' सिनेमा बघितल्यानंतर विचार केला, की मी शून्य आहे.' शाहिद यावर्षी फरहान अख्तरसोबत आयफा अवॉर्ड सोहळा होस्ट करणार आहे. हा सोहळा अमेरिकेमध्ये आयोजित करण्यात आला आहे. त्यावर त्याने सांगितले, 'मला आनंद वाटतो, की आयफाने माझी पुन्हा होस्टिंगसाठी निवड केली. मला हॉतिकचा डान्स बघण्याची खूप उत्सूकता आहे. तो इंडस्ट्रीचा एक उत्कृष्ट डान्सर आहे.'
फरहान पत्रकार परिषदेत म्हणाला, 'आयफा अवॉर्ड सोहळा पुन्हा होस्ट करायला मिळत आहे. त्यासाठी मी खूप आनंदी आहे. ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. मला शाहिदसोबत होस्टिंगची संधी मिळत आहे, याचीही उत्सूकता आहे. मी या सोहळ्याला मजेदार बनवण्याचा पूर्ण प्रयत्न करेल.'
भारतीय सिनेमामध्ये महत्वपूर्ण योगदान देण्यासाठी अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांना यावर्षी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या गोष्टीचा खुलासा प्रसिध्द दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी पत्रकार परिषदेत केला. यावेळी काही लोकांना सन्मानितसुध्दा करण्यात आले
परत्रकार परिषदेत पोहोचलेल्या तिन्ही स्टार्सची काही खास छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...