आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • IJW 2014: Neha Dhupia, Chitrangada Singh, Ameesha Patel Are Ramp Divas

IIJW 2014साठी नटल्या या सौंदर्यवती, रॅम्पवर चालून कार्यक्रमात लावले चार चाँद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
IIJW 2014 इव्हेंटमध्ये रॅम्पवर अभिनेत्री नेहा धूपिया, लीसा रे, अमिषा पटेल आणि कल्कि कोचलिन
मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल्सशी एकत्र झलक केवळ रॅम्पवरच दिसते. अशीच झलक मुंबईच्या ग्रँड हयातमध्ये आयोजित IIJW इव्हेंटमध्ये (इंडिया इंटरनॅशनल ज्वेलरी वीक) पाहायला मिळाली. तीन दिवसीय या इव्हेंटमध्ये बॉलिवूडच्या अनेक प्रसिध्द अभिनेत्री आणि मॉडेल्स दिसून आल्या.
नेहा धूपिया
इव्हेंटच्या पहिल्या दिवशी अभिनेत्री नेहा धूपिया रॅम्पवर दिसली. माजी मिस इंडिया नेहा गितांजली ज्वेलर्सच्या ब्रँडसह रॅम्पवर चालली. ती 'रॉयल ब्राइड' लूकमध्ये दिसली. नेहाने मरुन रंगाचा लहंगा परिधान केलेला होता. सोबतच, तिने रुबी आणि डायमंड ज्वेलरी घातलेली होती.
चित्रगंदा सिंह
अभिनेत्री चित्रगंदा सिंहसुध्दा पहिल्या दिवशी रॅम्पवर दिसली. तिने मोनी अग्रवालने डिझाइन केलेल्या ड्रेसह SGL ज्वेलरी घातलेली होती. चित्रगंदा लाल रंगाच्या लिबासमध्ये दिसून आली. तिचा लूक एखाद्या नववधूप्रमाणे होता. तसेच, कुंदन-पोल्की सेटसह नथ घालून ती खूपच सुंदर दिसली.
अमिषा पटेल
'कहो ना प्यार है'सारख्या हिट सिनेमांमध्ये झळकलेली अभिनेत्री अमिषा पटेलही रॅम्पवर कॅटवॉक करताना दिसली. अमिषाने हिरव्या आणि गुलाबी रंगाच्या लहंगासह सूर्या ज्वेलरी परिधान केली होती. तिच्या कानातील मोठे झुमकेसुध्दा तिच्यावर उठून दिसत होते.
कल्कि कोचलीन
अभिनेत्री कल्कि कोचलीनसुध्दा IIJW 2014 इव्हेंटमध्ये रॅम्पवर चालताना दिसली. तिने ब्राइड गाऊन परिधान केलेला होता. कल्किने प्रितीव्दारा डिझाइन केलेली ज्वेलरी घातलेली होती. तिच्या गळ्यात एका मोठ्या साइजचा नॅकलेस दिसत होता.
लीसा रे
'कसूर' सिनेमामधून चर्चेत अलेली अभिनेत्री लीसा रेसुध्दा दिर्घकाळानंतर या इव्हेंटमध्ये दिसली. तिने फराह खान अलीने डिझाइन केलेली ज्वेलरी घातली होती. लीसा रेने पांढ-या रंगाचा बॅकलेस ब्राइड ड्रेस परिधान केला होता.
इव्हेंटमध्ये या सर्व अभिनेत्री नववधूप्रमाणे नटून रॅम्प चालल्याने कार्यक्रमाला चार चाँद लागले. एकापेक्षा एक सुंदर दिसणा-या या सौंदर्यवतींची खूप दिवसांनी झलक पाहायला मिळाली.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा IIJW 2014 (इंडिया इंटरनेशनल ज्वेलरी वीक) इव्हेंटमध्ये नटून-थटून रॅम्पवर कॅटवॉक करणा-या या अभिनेत्रींची खास छायाचित्रे...