आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इलियानाने मॅगझिनसाठी केले हॉट फोटोशूट, बघा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रूजने एमडब्ल्यू मॅगझिनच्या एप्रिल महिन्याच्या अंकासाठी एक हॉट फोटोशूट केले आहे. या फोटोशूटसाठी इलियानाने ब्लॅक स्विमसूट परिधान केला. शिवाय व्हाइट स्विमसूटमध्येही तिने पोझ दिल्या. इलियानाचे हे फोटोशूट समुद्रकिना-यावर पार पडले.
अलीकडेच इलियानाचा 'मैं तेरा हीरो' हा सिनेमा रिलीज झाला. या सिनेमात तिच्यासह वरुण धवन आणि नर्गिस फाखरी मेन लीडमध्ये होते. इलियाना प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री असून तिने तेलगू, तामिळ आणि कन्नड सिनेमांत अभिनय केला आहे.
2012मध्ये अनुराग बसूच्या 'बर्फी' या सिनेमाद्वारे इलियानाने बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. त्यानंतर ती शाहिद कपूरसह 'फटा पोस्टर निकला हीरो' या सिनेमात झळकली होती. मैं तेरा हीरो हा इलियानाचा तिसरा बॉलिवूड सिनेमा आहे. आता लवकरच ती गोविंदा आणि सैफ अली खान स्टारर 'हॅपी एंडिंग' या सिनेमात झळकणार आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा इलियानाच्या या हॉट फोटोशूटची खास झलक...