अहमदबाद- येत्या 25 जानेवारी रोजी अहमदाबादमध्ये तब्बल 180 दिग्गज मंडळी उपस्थित राहणार आहे. यामध्ये बॉलिवूडचा सुपरस्टार
सलमान खानसुध्दा सामील होणार आहे. 25 जानेवारीला अहमदाबादला सरदार पटेल स्टेडिममध्ये सेलिब्रिटी क्रिकेट लीगचे दोन सामने होणार आहेत. या सामन्यासाठी चार संघाचे खेळाडू 24 जानेवारी रोजी अहमदाबादला पोहोचणार आहेत.
चारही संघासोबत त्यांच्या ग्लॅमरस ब्रॅन्ड अॅम्बेसेडर असतील. यामध्ये मुंबई संघाची हुमा कुरेशी, चित्रंगादा सिंह, चेन्नई संघाची त्रिशा, भोजपूरी संघाची पांखी हेडगे, अक्षरा सिंह, शुभी शर्मा आणि बंगाली संघाची रायमा सेन, पायल सरकार या ब्रॅन्ड अॅम्बेसेडर
आपल्या संघाला चिअर-अप करण्यासाठी येणार आहेत.
सीसीएलचे वेळापत्रक-
- मुंबई हीरोज V/s चेन्नई रायनोज (वेळ - दुपारी 2.30पासून संध्याकाळी 6.30पर्यंत)
- भोजपुरी दबंग V/s बंगाल टायगर्स (वेळ- संध्याकाळी 7.00पासून रात्री 11.00पर्यंत)
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा कोण-कोणत्या अभिनेत्री कोणत्या संघाच्या ब्रॅन्ड अॅम्बेसेडर आहेत...