आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इम्रान खान-कंगणा राणावत करणार ‘कट्टी बट्टी’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘गोरी तेरे प्यार में’ नंतर इम्रान खानने कोणताच सिनेमा साइन केला नव्हता. हा त्याच्या करिअरमधील आतापर्यंतचा मोठा ब्रेक होता. आता इम्रान निखिल अडवाणीचा ‘कट्टी बट्टी’ करणार आहे. यामध्ये तो ‘क्वीन’ कंगणा राणावतसोबत काम करणार आहे. या सिनेमाची निर्मिती यूटीव्ही मोशन पिक्चर्स करणार आहे.
सिनेमाचे शुटिंग सप्टेंबरमध्ये सुरू होणार आहे. यात मॅडी (इम्रान) आणि पायल (कंगना) ची कथा आहे. सिनेमाची कथा अंशुल सिंघलने लिहिली आहे. सिनेमा निर्मितीची योजना बर्‍याच दिवसांपासून सुरू होती. मात्र, प्रमुख पात्रांची निवड निश्चित झाली नसल्याने सिनेमाचे काम सुरू करण्यात आले नव्हते. दिग्दर्शक निखिल अडवाणी सध्या सूरज पांचोली आणि अथिया शेट्टी अभिनीत ‘हीरो’च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे.