आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इम्रानचे मामाच्या पावलावर पाउल..

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेतन भगतच्या ग्रंथ ‘फाइव्ह पॉइंट समवन’ वर आधारित ‘3 इडियट्स’ चित्रपटाच्या यशानंतर आता त्याचा दुसरा ग्रंथ ‘2 स्टेट्स’वर देखील एक चित्रपट बनवण्याची योजना सुरू आहे. दोन वर्षापूर्वीच साजिद नाडियाडवालाने यावर चित्रपट बनवण्याचे अधिकार विकत घेतले आहेत. पूर्वी शाहरुख खानला घेऊन चित्रपट बनवण्याचा त्याचा विचार होता. पण काही कारणामुळे हे शक्य झाले नाही. नंतर करण जोहर या प्रोजेक्टमध्ये सामील होताच रणबीर कपूरचे नाव समोर आले होते, पण ते ही शक्य झाले नाही. आता या चित्रपटात इम्रान खानची वर्णी लागली आहे. यापूर्वी चेतनच्या ग्रंथावर आधारित चित्रपटात आमिर खानने काम केले होते. आता भाचा इम्रानदेखील मामाच्या पावलावर पाऊल ठेवत आहे.