आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकुमारसह लग्नाची घाई नाही, जाणून घ्या काय म्हणाली पत्रलेखा?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पत्रलेखा आपल्या करिअरची सुरूवात हंसल मेहता यांच्या 'सिटीलाइट्स' सिनेमामधून करत आहे. यामध्ये ती राजस्थानच्या महिला राखीच्या पात्रात आहे. ती आपला पती आणि मुलगी यांच्यासह सुखी आणि समाधानी जीवन जगण्यासाठी मुंबईमध्ये येते. त्यानंतर नाइलाजास्तव डान्सर बनते. करिअरमधील पहिलेच पात्र तिच्यासाठी खूप कठिण आहे. याविषयी पत्रलेखाने आमच्यासोबत बातचीत केली...
१. पात्राचा अनुभव घेऊन भावूक झाले
हंसल मेहता आम्हाला राजस्थानला घेऊन गेले होते. आम्ही दोन ते तीन आठवडे तिथे राहिलो. तेथील लोकांची भाषा, राहणीमान शिकण्याचा प्रयत्न आम्ही केला. राखीचे आयुष्य इतके दु:खाने आणि कष्टाने भरलेले होते, की मला रात्रीसुध्दा तिचेच स्वप्न पडायचे. मी झोपेतच रडायचे. मी सतत तिचाच विचार करायचे. खूप तणावासह चांगले क्षणसुध्दा आम्ही अनुभवले. रस्त्यावर विकले जाणा-या चाटची हंसल आम्हाला टेस्ट घ्यायला सांगायचे.

बॉलिवूडची कोणतीही पाश्वभूमी नसताना लोकांनी माझ्या 'सिटीलाइट्स'ला खूप पसंत केले आणि प्रशंसादेखील केली. खूप प्रसिध्द लोकांनी आणि दिग्गजांनी आमची स्तुती केली. जेव्हा आलियाने सिनेमातील राखीच्या भूमिकेमुळे भावूक होऊन मला अलिंगन दिले तेव्हा मलाच विश्वास बसत नव्हता.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या पत्रलेखाने आणखी काय-काय सांगितले...