आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

WEDDING PIX : दोन वर्षांपूर्वी दिग्दर्शक मोहित सूरीची आयुष्यभराची जोडीदार बनली उदिता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(उदिता गोस्वामी आणि मोहित सूरीचे लग्नातील छायाचित्र)
मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री उदिता गोस्वामीने आज वयाची 31 वर्षे पूर्ण केली आहेत. पाप या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणा-या उदिताचे फिल्मी करिअर फार यशस्वी ठरले नाही. 29 जानेवारी 2013 रोजी उदिताने तिचा बॉयफ्रेंड आणि बॉलिवूडचा नावाजलेला दिग्दर्शक असलेल्या मोहित सूरीसोबत लग्न केले. या लग्नात बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते.
लग्नापूर्वी नऊ वर्षे हे दोघे रिलेशनशिपमध्ये होते. मोहित सूरीची मामेबहीण असलेल्या पूजा भटने 'पाप' या सिनेमाद्वारे उदिताला फिल्म इंडस्ट्रीत लाँच केले होते. उदिताने आपल्या करिअरमधील 'जहर' हा दुसरा सिनेमा मोहित सूरीसोबत केला होता. हा सिनेमा मोहित सुरीने दिग्दर्शित केला होता. याचकाळात दोघांचे सूत जुळले होते.
मोहित-उदिताच्या लग्नात पोहोचले होते अनेक सेलिब्रिटी
मोहित सूरी आणि उदिता गोस्वामीचे लग्न पारंपरिक पद्धतीने झाले होते. मोहितने लग्नात व्हाइट कुर्ता-पायजामा आणि हाफ जॅकेट परिधान केले होते. तर उदिता रेड कलरच्या लहेंगा चोलीत दिसली होती. या दोघांना भावी आयुष्याच्या शुभेच्छा देण्यासाठी महेश भट्ट, कंगना रनोट, विक्रम भट्ट, श्रद्धा कपूर, जॅकलीन फर्नांडिस, गोविंदा, केन घोष, दीया मिर्जा, इमरान हाशमी, तनुश्री दत्तासह अनेक सेलिब्रिटी पोहोचले होते.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा मोहित-उदिताच्या लग्नाचा खास अल्बम...