आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • In Pics: Introducing You To Mrs Rani Mukerji Chopra On Her First Appearance Post Marriage

नववधू मी बावरते.... लग्नानंतर पहिल्यांदाच समोर आली मिसेस चोप्रा, पाहा राणीचे PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - लग्नाच्या तब्बल महिनाभरानंतर बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी एका सोशल इवेंटमध्ये दिसली. राणीच्या सासूबाई पामेला चोप्रा यांनी एक नवीन फॅशन स्टोअर लाँच केले आहे. आनंदकुंज (लिकिंग रोज, आर्य समाजवळ, सांताक्रूझ) येथे हे नवीन स्टोअर उघडण्यात आले आहे. हे भारतातील पहिले असे फॅशन स्टोअर आहे, जे सिनेमांपासून प्रेरित आहे. दिवा'नी नावाचे हे स्टोअर यशराज फिल्म्स आणि केबीएसएत प्रायव्हेट लिमिटेडच्या संयुक्त विद्यमानाने सुरु करण्यात आले आहे.
लाँचिंग इवेंटमध्ये राणी लाल रंगाच्या सूटमध्ये दिसली. नववधूचे तेज राणीच्या चेह-यावर दिसत होते. रेड कलरचा ड्रेस, भांगात कूंकू, हातात चुडा, कपाळावर टिकली अशा पारंपरिक रुपात राणी खूप सुंदर दिसली.
21 एप्रिलला बोहल्यावर चढल्यानंतर राणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने पहिल्यांदाच मीडियासमोर आली होती. लग्नानंतर राणीची एक झलक बघण्यासाठी तिचे चाहते आतुर होते. स्टोअर लाँचिंगच्या निमित्ताने राणीच्या चाहत्यांची उत्सुकता संपली आणि त्यांना राणीची लग्नानंतरची झलक बघता आली आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा नववधू राणीची खास छायाचित्रे...