आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • In Pics: Meet Kareena Kapoor’s Beautiful Step Daughter Sara Ali Khan

In Pics: भेटा करीना कपूरची सावत्र मुलगी साराला, ग्लॅमरमध्ये अभिनेत्रींना देते मात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेत्री करीना कपूर आणि सैफ अली खान यांच्या लग्नाला आता लवकरच दोन वर्षे पूर्ण होणार आहेत. लग्नानंतरच्या या काळात करीनाचे सैफच्या दोन मुलांशी मैत्रीचे संबंध निर्माण झाले आहेत. अभिनेता सैफ अली खानला पहिली पत्नी अमृता सिंगपासून दोन मुले असून सारा आणि इब्राहिम ही त्यांची नावे आहेत. या दोघांशीही आपले खूप चांगले संबंध असल्याचे स्वतः करीनाने कबूल केले आहे. त्या दोघांची मी एक चांगली मैत्रीण असल्याचेही करीनाने म्हटले आहे.
विशेषतः साराची करीना चांगली मैत्रीण झाली आहे. सैफची थोरली मुलगी सारा आता वीस वर्षांची झाली आहे. सध्या अमेरिकन युनिव्हर्सिटीत ती उच्चशिक्षण घेत आहे. सारासुद्धा आपल्या आईवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत बी टाऊनमध्ये एन्ट्री घेणार असल्याची चर्चा आहे. मात्र शिक्षण पूर्ण झाल्याशिवाय सारा अभिनयात करिअर सुरु करणार नाही, असे तिची आई अमृताने एका मुलाखतीत सांगितले.
सारा तिची आई अमृतासह एका लाइफस्टाइल मॅगझिनच्या कव्हरपेजवर झळकली होती. त्यानंतर तिला सिनेसृष्टीतून ब-याच ऑफर्स यायला सुरुवात झाली होती. सारासुद्धा सौंदर्यात बी टाऊनच्या अभिनेत्रींना मात देते. करीना-सैफच्या लग्नात साराची खास झलक बघायला मिळाली होती.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला सैफच्या या लाडक्या लेकीची खास छायाचित्रे दाखवत आहोत. या छायाचित्रांमध्ये सारा आणि करीना यांच्यातील बॉडींगसुद्धा पाहायला मिळते. पुढील स्लाईड्समध्ये पाहा साराची बालपणीपासून ते आत्तापर्यंतची खास छायाचित्रे...