बॉलिवूड स्टार्स फक्त गुडी गुडी भूमिका साकारुन यशोशिखरावर पोहोचलेले नाहीत. तर त्यांनी आपल्या करिअरमध्ये हटके, आऊट ऑफ द बॉक्स जाऊन भूमिका साकारल्या आहेत. कधीकधी हे स्टार्स विचित्र अवतारातसुद्धा पडद्यावर अवतरले आहेत. त्यांना या रुपात बघून प्रेक्षक पोटधरुन हसलेसुद्धा आहेत. करिश्मा कपूर,
शाहरुख खान,
सलमान खानसह अशा अनेक स्टार्सची नावे या यादीत आहेत. हे कलाकार केवळ विचित्र रुपात प्रेक्षकांच्या समोर आले नाहीत, तर त्यांनी आपल्या भूमिकांना योग्य न्यायसुद्धा दिला.
'अशोका' या सिनेमात शाहरुख खान, 'सुर्यवंशी'मध्ये सलमान खान, 'जानेमन' या सिनेमात
अक्षय कुमार, 'चांदनी चौक टू चायना' या सिनेमात दीपिका पदुकोण विचित्र अवतारात प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. करिश्मा कपूरने तर करिअरच्या सुरुवातीच्या काळात ब-याच सिनेमात अशा भूमिका साकारल्या आहेत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा विचित्र अवतारात पडद्यावर अवतरलेल्या कलाकारांची खास झलक...