आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • In Pics: When Abhishek Bachchan And Aishwarya Rai Bachchan Spilled Love In Public

Cannesमधील सोनमासळी ऐश्वर्य पाहून अभिषेकचे उडाले होश, जाणून घ्या काय म्हणाला?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजी मिस वर्ल्ड व अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन बुधवारी कान्स चित्रपट महोत्सवाच्या रेड कार्पेटवर अवतरली. चाळिशीत पोहोचलेली ऐश्वर्या गोल्डन रॉबर्टा कॅव्हॅली फिशटेल गाऊनमध्ये सोनेरी मत्स्यकन्येसारखीच भासत होती. ऐश्वर्याच्या या रुपापुढे हॉलिवूडच्या आघाडीच्या नायिकांचा रंग फिका वाटत होता. ऐश्वर्याच्या या रुपाची भूरळ केवळ चाहत्यांनाच नव्हे तर तिचा हबी अर्थातच अभिषेक बच्चनलासुद्धा पडली. ऐश्वर्याचे हे रुप पाहून त्याचे होशच उडाले. अभिषेकने ट्विटरवर आपली भावना व्यक्त केली.
अभिषेकने ऐश्वर्याचे कानच्या रेड कार्पेटवरील एक छायाचित्र पोस्ट करुन ट्विट केले, ''जवळपास 52 तासांपासून झोप नाही! डोळे जडावलेत.. अशात समोर सौभाग्यवती अशी दिसतेयं!! ओके. आता डोळे खाडक्न उघडले आहेत!'' (Almost 52 hrs without sleep! Eyes shutting... and the Mrs. Shows up looking like this!! Ok.. Eyes wide open now!)
अभिषेक सध्या शिमल्यात असून तेथे त्याच्या आगामी 'ऑल इज वेल' या सिनेमाचे शूटिंग सुरु आहे.
ऐश्वर्या आणि अभिषेक बी टाऊनमधील ग्लॅमरस कपल आहे. अभिषेकने पहिल्यांदाच आपल्या पत्नीवरचे प्रेम सार्वजनिकरित्या जाहीर केलेले नाही. यापूर्वी अनेकदा सार्वजनिक ठिकाणी हे कपल एकमेकांवरील प्रेम व्यक्त करताना दिसले.
आज आम्ही तुम्हाला अभि आणि ऐश्वर्याची अशीच काही छायाचित्रे दाखवत आहोत. ज्यामध्ये अभिषेक ऐश्वर्यावर लट्टू झालेला दिसतोय.