आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Incredible Blunders In Bollywood Movies You Probably Missed

PHOTOS: पाहा बॉलिवूडमधील गाजलेल्या सिनेमांमध्ये कसे-कसे आहेत BLUNDERS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः सिनेरसिक केवळ मनोरंजनासाठीच बॉलिवूड सिनेमे बघतात असा ट्रेंड सध्या दिसून येतोय. सिनेमा रिलीज होताच त्याच्या व्यावसायिक आकड्यांविषयी बोलले जाते. काही दिवसांनी प्रेक्षकांना त्या सिनेमांचा विसर पडतो. सिनेमांच्या कथानकांपेक्षा त्याचा निर्मिती खर्च, नफा आणि 100-200 कोटींविषयी चर्चा होत असते.

सिनेरसिकांनी जर या सिनेमांना लक्ष देऊन बघितले असता त्यातील चुका निदर्शनास येऊ शकतात. अनेकदा या चुका बघून प्रेक्षकांना नक्कीच हसू येईल. अनेकदा बॉलिवूड सिनेमे वास्तवापेक्षा खूप वेगळे असतात.
एखाद्या सिनेमात हीरोला गोळी लागते, मात्र दुस-याच दृश्यात त्याच्या शरीरावर जखमेची एकही खूण दिसत नाही. 'लगान' या सिनेमात आमिर खान (1892 चा काळ सिनेमात रेखाटण्यात आला आहे.) क्रिकेट खेळतो. या मॅचमध्ये सहा ओवर असतात. मात्र क्रिकेटमध्ये सहा ओवरचा फॉर्मेट 1982-83च्या काळात सुरु झाला होता.
याचप्रकारे अनेक सिनेमांमध्ये दिग्दर्शकांकडून झालेली चूक स्पष्ट दिसून येते. एक नजर टाकुया गाजलेल्या सिनेमांमधील अशाच काही चुकांवर...
चेन्नई एक्स्प्रेस
सिनेमातील एका दृश्यात शाहरुख खान रेल्वेतील आपला प्रवास स्लिपर कोचमध्ये करताना दिसतो. मात्र जेव्हा मीनम्माच्या गावाचे स्टेशन येते, तेव्हा तो स्लिपर कोचमधून नव्हे तर जनरल कोचमधून उतरताना दिसतो.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या दिग्दर्शकांकडून झालेल्या चुकांविषयी...