आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IVF सेरोगेसीच्या माध्यमातून आई झाली किरण राव, या Celebsनीसुद्धा अवलंबला हा मार्ग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः आमिर खान-किरण राव आणि शाहरुख खान-गौरी)
वेगवेगळ्या कारणांमुळे मूल होऊ न शकणारे आणि मूल हवंच ही इच्छा असलेले दाम्पत्य सरोगसी मार्गाचा अवलंब करताना दिसत आहेत. अभिनेता आमिर खान आणि त्याची दुसरी पत्नी किरण राव यांचा मुलगा आझाद सरोगसीच्या माध्यमातूनच जन्माला आला आहे. त्यांचा मुलगा आझाद आता तीन वर्षांचा झाला आहे. किरणने आई होण्यासाठी IVF सरोगसी तंत्रज्ञानाची मदत घेतली होती.
5 डिसेंबर 2011 रोजी आझादच्या जन्मावेळी आमिरने म्हटले होते, की त्यांचा हा मुलगा त्यांच्यासाठी खूप खास आहे. कारण त्याच्या जन्मासाठी त्यांनी अनेक अडचणींचा सामना केला. त्यांना डॉक्टरांनी IVF तंत्रज्ञानाची मदत घेण्याचा सल्ला दिला होता.

सरोगसी म्हणजे काय?
जन्मजात गर्भाशय नसणे, गर्भधारणा होण्यात अडचणी, वारंवार गर्भपात होणे, एखाद्या आजारामुळे प्रसूतीच्या वेळी स्त्रीच्या जिवाला धोका निर्माण होण्याची शक्यता अशा सगळ्या परिस्थितीत डॉक्टर सरोगसीचा पर्याय सुचवू शकतात. सरोगसीचे 'ट्रॅडिशनल' आणि 'गेस्टॅशनल' असे दोन प्रकार आहेत.
पहिल्या प्रकारात जोडप्यातील स्त्रीच्या स्वत:च्या बीजांडाचे जोडप्यातील पुरुषाच्या शुक्राणूंशी मीलन घडवून आणून ते त्याच महिलेच्या गर्भाशयात सोडले जाते.
गेस्टॅशनल सरोगसी या प्रकारात एखाद्या जोडप्यापैकी स्त्रीचे बीजांडे आणि शुक्राणूंचे प्रयोगशाळेत मीलन घडवून आणले जाते आणि तो गर्भ दुसऱ्या महिलेच्या गर्भाशयात ठेवला जातो. नऊ महिने ती महिला त्या गर्भाचा सांभाळ करते, मुलाला जन्म देते आणि मग ते बाळ संबंधित जोडप्याकडे सोपवले जाते.
अभिनेता आमिर खान आणि शाहरुख खानने गेस्टॅशनल सरोगसीच्या माध्यमातून आपल्या बाळाला जन्माला घातले आहे. आमिर आणि शाहरुखप्रमाणे काही सेलिब्रिटींनी सरोगसीचा अवलंब करुन आपल्या बाळाला जन्म दिला आहे.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या अशाच काही सेलिब्रिटी कपल्सविषयी...