आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फारच मधूर होता आवाज, पण आजाराने घेतला \'Indian Idol\'च्या या विजेत्याचा बळी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'इंडियन आयडॉल' या रिअॅलिटी शोचा विजेता गायक संदीप आचार्यची आज बर्थडे अॅनिव्हर्सरी आहे. 4 फेब्रुवारी 1984 रोजी त्याचा जन्म राजस्थानच्या बीकानेरमध्ये झाला होता. आज संदीप आपल्यात असता तर तो 31वा वाढदिवस साजरा करत असता. 15 डिसेंबर 2013 रोजी आजारपणाने त्याचे निधन झाले. संदीप 'इंडियन आयडॉल'च्या दुस-या पर्वाचा विजेता होता.
संदीप बालपणापासूनच अभ्यासू प्रवृत्तीचा होता. त्याने सायन्समध्ये पदवी शिक्षण घेतले होते. तो चार बहीण-भावंडांमध्ये सर्वात लहान होता. संदीपच्या गायन कौशल्याविषयी त्याच्या कुटुंबीयांना ठाऊक नव्हते. त्याने पहिल्यांदा शाळेतील एका स्पर्धेत गायन स्पर्धेत भाग घेतला आणि त्याचा आवाज सर्वांना मंत्रमुग्ध करून गेला.
शाळेतील स्पर्धेत होता रनर-अप-
बीकानेरच्या एका शाळेत झालेल्या गायन स्पर्धेत संदीप रनर-अप होता. येथूनच त्याला ओळख मिळाली आणि त्याने शहरात अनेक परफॉर्मन्स दिले. पाहता पाहता तो शहराचा स्टार बनला. त्यानंतर 2006मध्ये त्याला 'इंडियन आयडॉल'मध्ये भाग घेण्याची संधी मिळाली आणि तो हा शो जिंकला.
संदीपचे कुटुंब-
चार बहीण-भावंडांमध्ये लहान संदीपचे 2012मध्ये लग्न झाले होते. त्याच्या पत्नीचे नाव नम्रता आचार्य आहे. निधनाच्या जवळपास 20 दिवसांपूर्वी त्याला एक गोंडस मुलगी झाली होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा संदीप आचार्यच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण...