आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या मॉडेल्सपैकी कुणी कामाच्या अभावामुळे तर कुणी प्रेमभंग झाल्याने कवटाळले मृत्युला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- मॉडेल अर्चना पांडे (L) आणि मोना खन्ना)
ग्लॅमर इंडस्ट्रीत आणखी एका मॉडेलने आत्महत्या केल्याची घटना नुकतीच उघड झाली आहे. 26 वर्षीय अर्चना पांडे नावाच्या मॉडेलने मुंबईतील अंधेरी परिसरातील आपल्या फ्लॅटमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्चनाने तीन दिवसांपूर्वीच गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. तीन दिवसांनी कुजलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह मिळाला.
अर्चनाने मॉडेलिंगसोबतच दाक्षिणात्य सिनेमांमध्येही काम केले होते. पोलिसांना तिच्या घरातून चिठ्ठी सापडली आहे. प्रियकरासोबत नातेसंबंधातील तणाव आणि आर्थिक अडचणींमुळे तिने आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
एकामागून एक घडणा-या या घटनेनंतर ग्लॅमर इंडस्ट्रीतील एक भयाण सत्य पुन्हा उघड झाले आहे. काम न मिळाल्यामुळे अनेक तरुणी नैराश्येतून चुकीच्या मार्गांचा अवलंब करतात किंवा संघर्षाला कंटाळून मृत्यूला कवटाळतात.
एक महिन्यापूर्वीच फिल्म इंडस्ट्रीत काम न मिळाल्यामुळे मॉडेल आणि अभिनेत्री राहिलेल्या मोना खन्नानेसुद्धा गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या अशाच आणखी काही मॉडेल्सविषयी...