आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • See Photos Noyonita Lodh Who Represented India In Miss Universe

टॉप 15मध्ये झाली होती मिस इंडिया नोयोनिताची निवड, पाहा ग्लॅमरस PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटोः मिस इंडिया नोयोनिता लोध
25 जानेवारी रोजी अमेरिकेच्या मियामी येथे मिस युनिव्हर्स सौंदर्य स्पर्धा पार पडली. मिस कोलंबिया पाओलीना वेगा हिने 2015 चा मिस यूनिव्हर्सचा किताब आपल्या नावी केला. 2013 ची विजेती ग्रॅब्रिएला इस्लरने तिला यंदाचा मिस यूनिव्हर्सचा मुकूट बहाल केला. मिस यूएसए सोनिया सांचेज पहिली रनर अप, मिस यूक्रेन डायना हरकुशा सेकंड रनर अप तर, मिस नीदरलैंड्स थर्ड रनर राहिल्या.
या स्पर्धेत 21 वर्षीय नोयोनिता लोध हिने भारताचे प्रतिनिधित्व केले. मिस युनिव्हर्स 2015च्या स्पर्धेत नोयोनिता टॉप 15मध्ये स्थान प्राप्त करण्यात यशस्वी ठरली. मात्र टॉप 10मध्ये ती स्थान मिळवण्यात अपयशी ठरली. या स्पर्धेत 88 देशांच्या सौंदर्यवतींनी सहभाग नोंदवला होता. 2000 मध्ये भारताच्या लारा दत्ताने हा मान पटकावला होता.
कोण आहे नोयोनिता लोध
बंगळूरुमध्ये जन्मलेल्या नोयोनिताने आपले शालेय शिक्षण येथेच पूर्ण केले. 2011 मध्ये मॅक्स मिस बंगळूरु स्पर्धेत ती सेकंड रनरअप ठरली होती. नोयोनिता बंगळूरुच्या सेंट जोसेफ कॉलेजमध्ये बिझनेस मॅनेजमेंटचा अभ्यास करत आहे. माजी मिस युनिव्हर्स लारा दत्ता हिला ती प्रेरणास्थान मानते.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा नोयोनिता लोध हिची तिच्या फेसबुक अकाउंटवरुन घेण्यात आलेली छायाचित्रे...