आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Inside Photos Of The Office Of Director Omung Kumar

Photos: \'मेरी कोम\'च्या दिग्दर्शकाचे ऑफिस आहे \'बिग बॉस\'च्या घरासारखे, पाहा खास झलक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(आपल्या ऑफिसमध्ये दिग्दर्शक उमंग कुमार)
मुंबईः 2014 मध्ये रिलीज झालेल्या आणि बॉक्स ऑफिसवर गाजलेल्या 'मेरी कोम' या सिनेमाचे दिग्दर्शक आणि सेट डिझायनर उमंग कुमार यांनी 'चक्रवर्ती सम्राट अशोक' या मालिकेचा सेट डिझाइन केला आहे. ही मालिका नुकतीच छोट्या पडद्यावर दाखल झाली आहे. उमंग कुमार आणि त्यांच्या पत्नी विनिता कुमार यांचे मुंबईत 'ब्लू लोटस प्रॉडक्शन' या नावाने स्वतःचे प्रॉडक्शन हाऊस आहे.
dainikbhaskar.comने त्यांच्या प्रॉडक्शन हाऊसला भेट दिली आणि उमंग कुमार यांच्यासोबत खास बातचीत केली. अंधेरीस्थित या ऑफिसच्या जागेविषयी उमंग यांनी सांगितले, "तीन वर्षांपूर्वी मी या ऑफिसची जागा विकत घेतली होती. डेकोरेशनमध्ये वापरण्यात येणारे लाकूड आणि काचांमुळे हे एका बँकेसारखे दिसत होते. येथे बरेच केबिन्स आणि क्युबिकल्स होते."
उमंग कुमार आणि त्यांच्या प्रॉडक्शन डिझायनर असलेल्या पत्नी विनिता यांनी या जागेचे संपूर्ण मेकओव्हर केला. त्यांनी आपल्या ऑफिसचा प्रत्येक कोपरा ग्रीस या यूरोपियन देशासारखा तयार केला आहे. याविषयी ते सांगतात, ''मला ग्रीस पसंत आहे.'' या ऑफिसच्या इंटेरियरविषयी ते सांगतात, ''मी भिंतींना नवीन रुप दिले. सोबतच कोप-यांना क्युबिकल शेप दिला आहे.''

पतीसोबत या आलिशान बंगल्यात राहते रवीना टंडन, पाहा INSIDE PHOTOS

जेव्हा dainikbhaskar.comने या ऑफिसमध्ये फेरफटका मारला, तेव्हा अनेक सिनेमे आणि टीव्ही प्रोजेक्ट्सवर त्यांच्या ऑफिसच्या इंटेरियरचा प्रभाव असल्याचे लक्षात आले. त्यांच्या ऑफिसच्या सिलिंगमध्ये लाकडी बीम्स असून त्याची झलक बघता आपण यंदाच्या 'बिग बॉस'च्या घरात असल्याचा भास होतो. विशेष म्हणजे 'बिग बॉस'च्या आठव्या पर्वाचे घरदेखील उमंग कुमार यांनीच डिझाइन केले होते. याशिवाय उमंग यांच्या ऑफिसचे प्रवेशद्वार आणि पंख्यांवरील पेटिंग 'बिग बॉस'च्या गेल्या पर्वाच्या (जन्नत आणि जहन्नूम) थीमची आठवण करुन देणारे आहे. याविषयी उमंग यांनी सांगितले, की त्यांनी सुरुवातील आपले ऑफिस डिझाइन केले, त्यानंतर या क्रिएटिव्ह आयडिया सिनेमा आणि टीव्ही शोजसाठी वापरल्या.
उमंग कुमार यांच्या ऑफिसमध्ये काही यूनिक वस्तू बघायला मिळतात. या वस्तू त्यांच्या पत्नीच्या पसंतीच्या आहेत. ऑफिसच्या भिंतींवर माता हारी, फ्रीडा कहलो आणि एंजल्स यांसारख्या ख्रिश्चन आर्ट्सचा प्रभाव बघायला मिळतो.
Inside Photos: 19व्या मजल्यावर आहे Bigg Bossची Ex-स्पर्धक दीपशिखाचा फ्लॅट
पुढील स्लाईड्समध्ये पाहा उमंग कुमार यांच्या ऑफिसची खास छायाचित्रे...
सर्व फोटोः अजीत रेडेकर