आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Inside Photos: Priyanka, Mannara At 21st Lions Gold Awards

पाहा लायन्स गोल्ड अवॉर्ड्स सोहळ्यात पोहोचलेल्या सेलेब्सची Inside Pics

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- प्रियांका चोप्रा कजिन मनारासोबत)
मुंबई- बी-टाऊनचे अनेक सेलेब्स मंगळवारी (6 जानेवारी) लायन्स गोल्ड अवॉर्ड सोहळ्यात सामील झाले होते. त्यामध्ये प्रियांका चोप्रा, मनारा, डेजी शाहसोबत अभिषेक बच्चन, वरुण धवन, टायगर श्रॉफसह अनेक स्टार्स पोहोचले होते.
'जिद'मधून बॉलिवूडमध्ये एंट्री केलेल्या प्रियांकाची कजिन मनारा इव्हेंटमध्ये बॅकलेस अवतारात दिसली. तिने लहंगा आणि बॅकेलस चोली परिधान केली होती. मनारा आणि प्रियांकाने यावेळी अनेक पोज कॅमे-याला दिल्या. प्रियांका इव्हेंटमध्ये आई मधु चोप्रासोबत पोहोचली. फराह खान, पूनम ढिल्लन, लीसा हेडन, डेजी शाहसह अनेक सेलेब्सची या कार्यक्रमात आपली उपस्थिती दर्शवली. दुसरीकडे, टायगर श्रॉफला त्याच्या डेब्यू 'हिरोपंती' सिनेमासाठी पुरस्कार देण्यात आला.
अभिषेक बच्चन, प्रेम चोप्रा, उमंग कुमार, किकू शारदालासुध्दा अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. इव्हेंटमध्ये वरुण धवन मस्तीभ-या अंदाजात दिसला.
लायन्स इंटरनॅशनल क्लबकडून मनोरंजन क्षेत्रात मोलाचे योगदान असलेल्यांना हा पुरस्कार प्रदान केला जातो. या वर्षी या अवॉर्ड सोहळ्याचे 21वे वर्ष आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या अवॉर्ड सोहळ्यातील आतील छायाचित्रे...