‘एकेकाळी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ गाजवणार्या दिलीपकुमार यांची पडद्यामागची व्यक्तिरेखा मांडण्याबरोबरच त्यांच्या विविध पैलूंचा, योगदानाचा वेध घेणारे त्यांचे चरित्र वाचकांना प्रेरणादायी ठरेल अशी आशा आहे.’ असे हृद्य मनोगत ज्येष्ठ अभिनेत्री व दिलीपकुमार यांच्या पत्नी सायराबानो यांनी व्यक्त केले. सोमवारी बॉलिवूड सेलिब्रिटींच्या मांदियाळीत ट्रॅजेडी किंग म्हणून प्रसिद्ध असलेले दिलीपकुमार यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन दिमाखदार सोहळ्यात करण्यात आले.
‘द सबस्टन्स अॅँड द शॅडो’ हे चरित्र दिलीपकुमार व त्यांच्या कुटुंबीयांशी गेल्या 40 वर्षांपासून स्नेह व परिचय असलेल्या ज्येष्ठ लेखिका व पत्रकार उदय तारा नायर यांनी लिहिले आहे.
सायराबानो यांच्यासह
अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, आमिर खान, चरित्राच्या लेखिका उदय तारा नायर उपस्थित होते. ज्येष्ठ अभिनेत्री वैजयंतीमाला, फरिदा जलाल, जितेंद्र, झीनत अमान, डॅनी डेंझोपा, प्रियंका चोप्रा, संजय लीला भन्साळी, माधुरी दीक्षित, सुभाष घई, जावेद अख्तर,
प्रियांका चोप्रा, किरण राव, विनोदवीर कपिल शर्मा, विनोदवीर अली असगर, रितेश देशमुख, करण जोहर, अयुब खान, अनिल अंबानी, कोकिलाबेन अंबानी, संजयलीला भन्साळी, डॉ. श्रीराम नेने, गायक शान, या सेलेब्ससह अनेकांनी या सोहळ्याला उपस्थिती लावली होती.