मुंबईः सोमवारी बॉलिवूड अभिनेता आणि भाजपचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांचा मुलगा कुशचे वेडिंग रिसेप्शन आयोजित करण्यात आले होते. यावेळी महानायक
अमिताभ बच्चन पत्नी जया बच्चन यांच्यासोबत मुंबईतील सहारा स्टार हॉटेलमध्ये पोहोचले होते. येथे अमिताभ बच्चन यांनी रजनीकांत, ऋषी कपूर, सनी देओल आणि शत्रुघ्न सिन्हा यांची भेट घेतली.
मित्रांसोबत भेट झाल्याचा आनंद
बिग बींनी सोशल साइट्सच्या माध्यमातून व्यक्त केला आहे. या वेडिंग रिसेप्शनची काही छायाचित्रे त्यांनी
आपल्या फेसबूक पेजवर शेअर करुन लिहिले, "FB 833 - Meetings at wedding .. people and more people .."
या छायाचित्रांमध्ये अमिताभ आणि रजनीकांत यांच्या गप्पांचा फड रंगलेला दिसतोय. शिवाय बिग बीं शत्रुघ्न सिन्हा यांना भेटवस्तू देताना दिसत आहेत. एका छायाचित्रात ऋषी कपूर आणि बिग बी गळाभेट घेताना दिसत आहेत.