आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाहा लॅक्मे फॅशन वीकच्या शेवटच्या दिवशीचे INSIDE PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई: लॅक्मे फॅशन वीक विंटर/ फेस्टिव्हलचा 2014 (LFW) रविवारी (24 ऑगस्ट) समारोप झाला. हा इव्हेंट मंगळवारी (19 ऑगस्ट) सुरु झाला होता. इव्हेंटच्या 6 दिवसांमध्ये अनेक बॉलिवूड स्टार्सनी रॅम्पवॉक केला. शेवटच्या दिवशीसुध्दा अनेक अभिनेत्री आणि मॉडेल्स रॅम्पवर अवतरल्या होत्या.
शेवटच्या दिवशी रॅम्पवर अभिनेत्री आदिती राव हैदर, करिश्मा कपूर, जूही चावला, सेलना जेटली, काजोल, प्रियांका चोप्रा, ईशा गुप्ता, रिचा चड्डा, इलियाना डिक्रूजसह अनेक अभिनेत्री रॅम्पवर कॅटवॉक करताना दिसल्या. अभिनेत्री श्रीदेवी पती बोनी कपूरसोबत रॅम्पवर दिसली.
बॉलिवूचा यंगस्टार्स म्हणून ओळखला जाणारा वरुण धवनसुध्दा रॅम्पवॉक करताना दिसला. वरुणने यादरम्यान काळ्या रंगाचा शर्ट आणि पँटसह ब्लेझर परिधान केलेला होता.
या इव्हेंटच्या शेवटच्या दिवसाचे इनसाइड पिक्स आम्ही तुम्हाला या पॅकेजच्या माध्यमातून दाखवत आहोत. पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा सेलेब्सची खास छायाचित्रे...