मुंबई- सलमान खानने रविवारी (7 डिसेंबर) आई सलमा खान यांचा बर्थडे सेलिब्रेट केला. त्याने यानिमित्त एक पार्टी आयोजित केली होती. ही पार्टी बहीण अर्पिताच्या नव्या घरी दिली होती. पार्टीत कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते.
सलमानने बर्थडे पार्टीतील इनसाइड छायाचित्रे चाहत्यांसाठी शेअर केले आहेत. या छायाचित्रांमध्ये अलवीरा आणि अर्पिता सलमानसोबत दिसत आहे. आणखी एका छायाचित्रात दोन्ही बहिणी आई सलमासोबत दिसत आहे. सलमा यांचा 72वा वाढदिवस सर्व कुटुंबीयांनी साजरा केला. अर्पिताचा पती आयुष शर्मासुध्दा या पार्टीत उपस्थित होता.
सोहेल खान, अरबाज खानसह
अमृता अरोरा पती शकील लडकसोबत पार्टीत पोहोचली होती. पार्टीदरम्यान सर्व सदस्यांनी एकत्र फोटो काढले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा आई सलमा खान यांच्या बर्थडे पार्टीतील इनसाइड PICS...