आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Inside Pics: 'मैं तेरा हीरो'च्या सक्सेस बॅशमध्ये सेलेब्सची धमाल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - वरुण धवन स्टारर 'मैं तेरा हीरो' या सिनेमाची जादू बॉक्स ऑफिसवर चालली. सिनेमाला मिळालेल्या यशावरुन डेविड धवन यांचा रोमँटिक कॉमेडी सिनेमाची आयडिया आजही सुपरहिट असल्याचे स्पष्ट झाले. ट्रेड पंडित आदर्श यांनी ट्विट केले, की 'मैं तेरा हीरो' या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या आठवड्यात भारतात 38.48 कोटींचा व्यवसाय केला. या सिनेमाच्या बिझनेसवरुन हा सिनेमा यावर्षीचा सर्वाधिक कमाई करणारा सहावा सिनेमा ठरला आहे.
सिनेमाला मिळालेले यश पाहून वरुण धवन आनंदी आहे. आपला हा आनंद साजरा करण्यासाठी त्याने एक पार्टी आयोजित केली होती. या पार्टीत अर्जुन कपूर, सोनाक्षी सिन्हा, नर्गिस फाखरी, इलियाना डिक्रूज, राजपाल यादव, इवलिन शर्मा, एकता कपूर, सनी लियोन, डेनियल वेबर, सोफी चौधरी, हुमा कुरैशीसह बी टाऊनमधील बरीच तरुण मंडळी सहभागी झाली होती.
उशीरा रात्रीपर्यंत चाललेल्या या पार्टीत सर्वांनीच भरपूर धमाल-मस्ती केली. पार्टीत सर्वांनी सनीच्या बेबी डॉल या गाण्यावर ताल धरला होता.
मध्यंतरी बातमी होती, की एकता कपूर आणि सनी लियोन यांच्यात वाद निर्माण झाला आहे. मात्र पार्टीत दोघींना एकत्र बघून त्यांच्यात सर्वकाही ऑल इज वेल असल्याचे दिसून आले.
'मैं तेरा हीरो'च्या कमाईचे आकडे
दिवस कमाई
शुक्रवार 6.60 कोटी
शनिवार 8.03 कोटी
रविवार 8.10 कोटी
सोमवार 4.20 कोटी
मंगळवार 4.80 कोटी
बुधवार 3.40 कोटी
गुरुवार 3.35 कोटी
पुढील स्लाईड्सवर पाहा 'मैं तेरा हीरो'च्या पार्टीत पोहोचलेल्या स्टार्सची खास छायाचित्रे...