आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FACTS: \'शोले\'च्या शूटिंगवेळी प्रेग्नेंट होत्या जया बच्चन, थोडक्यात बचावले होते अमिताभ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('शोले' या सिनेमाच्या एका दृश्यात धर्मेंद्र आणि जया बच्चन, दुस-या दृश्यात जया बच्चन)
मुंबईः 39 वर्षांपूर्वी बॉक्स ऑफिसवर रमेश सिप्पी दिग्दर्शित 'शोले' हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमात बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत धर्मेंद्र आणि संजीव कुमार यांनी अभिनय केला होता. सोबतच अमजद खान यांनी साकारलेला गब्बर आजही प्रेक्षक विसरु शकलेले नाहीत. या सिनेमात जयची भूमिका साकारणारे बिग बी आज (11 ऑक्टोबर) वयाची 72 वर्षे पूर्ण केली आहेत. (मुंबईत आहेत बिग बींचे 300 कोटींपेक्षा जास्त किमतीचे 5 बंगले, पाहा या आलिशान घरांचे PIX)
1975 साली रिलीज झालेला आणि भारतीय सिनेमाच्या इतिहासातील अतिशय महत्त्वाचा हा सिनेमा काही दिवसांपूर्वीच 3D मध्येही रिलीज करण्यात आला. या सिनेमात हेमा मालिनी आणि जया बच्चन यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. या सिनेमातील सर्वच कलाकारांनी अविस्मरणीय भूमिका साकारल्या. म्हणूनच हा सिनेमा हिंदी सिनेसृष्टीतील मैलाचा दगड ठरला आहे. आजची तरुणाईसुद्धा या सिनेमाला पसंतीची पावती देते. (राजेश खन्ना यांना अमिताभ यांच्याविषयी वाटायचा हेवा, वाचा बिग बींची सुपरस्टार बनण्याची कहाणी)
सत्तरच्या दशकात देशभरात धूम करणा-या या सिनेमाविषयीचे काही रोचक किस्से सांगत आहोत. हे किस्से कदाचित प्रेक्षकांना ठाऊक असतील.
फॅक्ट क्रमांक 1..
या सिनेमात जया बच्चन यांनी ठाकुरच्या विधवा सूनेची भूमिका साकारली होती. या सिनेमाच्या शूटिंगवेळी जया बच्चन प्रेग्नेंट होत्या. त्यांना पहिली मुलगी झाली होती. तिचे नाव श्वेता आहे.
त्यानंतर 'शोले' सिनेमाचा प्रीमिअरवेळी सुद्धा जया बच्चन दुस-यांदा प्रेग्नेंट राहिल्या होत्या. त्यावेळी अभिषेक बच्चन त्यांच्या पोटात होता. (बिग बींच्या सर्वात महागड्या कारची किंमत आहे 4.5 कोटी, पाहा त्यांचे लग्झरी कार कलेक्शन)
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या आणखी काही रंजक फॅक्ट्स...