आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Interview Of Ajay Devgan About \'Singham Returns\'

Interview : प्रत्येकजण सिनेमापासून मोठ्या कमाईची अपेक्षा ठेवतो, मीही...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो : अजय देवगण)
रोहित शेट्टीच्या दिग्दर्शनात बनलेल्या अॅक्शन एंटरटेनर सिंघम रिटर्न्स तिकीट खिडकीवर वेगात पुढे जात आहे. सिनेमाने शुक्रवारी 30 तर शनिवारी 17 कोटींपेक्षा जास्त व्यवसाय केला. कमाईच्या या आकड्यांवर अजयचीही नजर आहे, कारण तो चित्रपटाचा नायक तर आहेच शिवाय निर्माताही. आपल्या कार्यशैलीत अजय सातत्याने मोठा बदल करत असून लवकर तो दिग्दर्शनातही उतरणार आहे. सिंघम रिटर्न्सच्या निमित्ताने त्याच्याशी साधलेल्या संवादाचा हा अंश...

एककलाकार किंवा निर्माता म्हणून तू किती तणावात आहेस? की, चार दिवसांचा विकेंड मिळाल्याने समाधान आहे?
- तणावतर सहकलाकारांपासून निर्माता आणि दिग्दर्शक सर्वांवरच असते. एका चित्रपटावर आपण मेहनत, पैसे, वेळ सर्वकाही लावतो. त्यामुळे सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीला उतरेल की नाही, याचा दबाव तर असतोच. निर्मिती खर्च आणि स्टारकास्टचे महत्त्वासोबतच प्रत्येक चित्रपट कमाईचे ध्येय पूर्ण करण्यासाठी काही कालावधी घेतो. या वेळी आम्हाला सलग चार दिवस मिळाले आहेत आणि येणाऱ्या आठवड्यांतही सिनेमा चांगली कमाई करील.
150 किंवा 200 कोटींचा आकडा किती महत्वाचा आहे?
आजकालप्रत्येक सिनेमा नवीन बेंचमार्क बनवत असून चित्रपटसृष्टी वेगाने पुढे जात असल्याचा आनंद आहे. माझे वडीलदेखील हा बदल पाहत आहेत. त्यांच्या काळात चित्रपट निर्मिती कमी होती, मात्र आता ही संख्या वाढत आहे. रिलीजचा पॅटर्नही बदलला, चित्रपटाच्या डिस्ट्रीब्युशनशी जोडलेल्या लोकांची संख्या वाढली. त्यामुळे आकड्यांपेक्षा जास्त आपल्याला चित्रपटाच्या कथेपासून चित्रपटांकनावर बारकाईने लक्ष द्यावे लागते. कलाकार, चित्रपटकार मोठ्या कमाईची अपेक्षा ठेवतो. मीदेखील ठेवतो. मात्र चित्रपटाच्या गुणवत्तेवरही पूर्ण ध्यान ठेवतो.
पुढील स्लाईड्समध्ये वाचा, अजयची संपूर्ण मुलाखत...