आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Interview: कतरिनाने सांगितले रणबीर आहे स्पेशल, सलमानचीसुध्दा केली प्रशंसा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- कतरिना कैफ)
मुंबई: मागील वर्षाच्या अखेरीस कतरिना कैफचा 'धूम 3' रिलीज झाला होता. सिनेमा सुपरहिट ठरला परंतु त्याचे सर्व श्रेय आमिर खानला देण्यात आले. 2 ऑक्टोबरला हृतिक रोशनसोबत तिचा 'बँग बँग' प्रदर्शित होत आहे. हा तिच्या करिअरचा सर्वात मोठा सिनेमा मानला जात आहे.
सिनेमाच्या मेकिंगदरम्यान हृतिक रोशनवर एक शस्त्रक्रिया झाली, कतरिना जखमी झाली, काश्मिरमध्ये अवोधरित्या प्रवेशाची घटना घडली आणि थायलँडमध्ये वादळ आले. मात्र, या सर्व समस्यांना पार करून सिध्दार्थ आनंद यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला. टॉम क्रूज आणि कॅमरॉन डियेज अभिनीत 'नाइट अँड डे' या हॉलिवूड सिनेमाचा हा रिमेक आहे. या सिनेमात नायकाची जेवढी अॅक्शन आहे तेवढीच अॅक्शन नायिकेचीदेखील पाहायला मिळणार आहे. त्यानंतर ती सैफ अली खानसोबत 'फँटम' सिनेमात गुप्तहेराची भूमिका साकारणार आहे. यातही ती स्टंट करताना दिसणार आहे. या निमित्त तिच्याशी झालेल्या बातचीतचे काही अंश...
रणबीर तुझ्यासाठी खास आहे, तरी स्वत:ला सिंगल म्हणतेस?
हो रणबीर माझ्यासाठी खास आहे. मला पाठिंबा देण्यासोबत माझ्या चुकाही सांगतो. सर्वांच्याच आयुष्यात प्रत्येक व्यक्तीचे वेगळे महत्व असते. रणबीरसोबत राहून मी जास्त स्मार्ट झाले आहे. लग्न जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत मी सिंगल राहणार आहे.
सोबत राहणेदेखील गुपचुप लग्न केल्यासारखेच आहे.
लग्न करून आपण आयुष्यभर लाइफ पार्टनरसोबत राहणार आहोत, तर त्यात लपवण्याचे काय कारण? मी गुपचुप लग्न करणार नाहीये.
मी 18 वर्षांची असताना सलमानला पहिल्यांदा भेटले होते. मी त्याच्याकडून अभिनय आणि हिंदीव्यतिरिक्त जीवनातील अनेक गोष्टी शिकले.
कतरिना (सलमानसोबतच्या बाँडिंगवर म्हणाली)
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा सलमानविषयी आणि फिल्मी करिअरविषयी काय म्हणाली कतरिना...