आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यांचे सिनेमे होतात 100% यशस्वी, वाचा 'PK'च्या दिग्दर्शकाचा Interview

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुमचा आवडता हिंदी चित्रपट दिग्दर्शक कोण, असे जर एखाद्या विचारले तर राजकुमार हिराणी असे उत्तर मिळेल. संहिता लेखन, संपादन, दिग्दर्शन या तिन्ही विभागांमध्ये त्यांचा हातखंडा आहे. दोन दशकांपूर्वी फेव्हिकॉलच्या जाहिरातीमध्ये दोन हत्तींद्वारे तुटणाऱ्या, चिकटणाऱ्या मुलींना दाखवून ‘ये फेव्हिकॉल का मजबूत जोड है टूटेगा नहीं’ असे म्हणणारा पेन्सिलसारख्या मिशा असणारा सडपातळ माणूस राजकुमार हिराणीच होते. ते आजही तसेच हसत आहेत.
चित्रपटाच्या कमाईच्या दबावातून मुक्त असणारे ते एकमेव दिग्दर्शक आहेत. असे असतानाही ते मुख्य प्रवाहात राहून गुणवत्तापूर्ण चित्रपट सातत्याने बनवत आहेत. १९ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या आमिर अभिनीत ‘पीके’बाबत त्यांच्याशी केलेली ही बातचीत...
आपला नवा चित्रपट ‘पीके’बद्दल दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांनी दिलखुलास चर्चा केली. आयुष्य असो किंवा चित्रपट, मला स्टाइलपेक्षा साधेपणाच अधिक आवडतो, असे ते आवर्जून सांगतात...
-आमिर चित्रपटातील सहकलाकारांच्या भूमिकेची दृश्ये कमी करण्याच्या मुद्द्यावर
आमिर खानच्या ‘रंग दे बसंती’, ‘दिल चाहता है’, ’लगान’, ‘३ इडिय‌ट‌्स’मध्ये अन्य कलाकारांना अधिक स्थान मिळाले आहे. ‘पीके’ हा एकमेव असा चित्रपट आहे जो पूर्णपणे आमिरवर आधारित आहे. त्यामुळे आमिर आपल्या चित्रपटामध्ये अन्य कलाकारांना अधिक स्थान देत नसल्याचा आरोप पूर्णपणे चुकीचा आहे.
तुम्ही हलके-फुलके विनोदी चित्रपट बनवता आणि ते १०० टक्के यशस्वी ठरतात...
मला जे पाहायला आवडतात तेच चित्रपट मी बनवतो. माझ्या हृदयातून साध्या कथाच निघतात. मी आणि अभिजात जोशीने हे ठरवले होते की, कमीच चित्रपट बनवावे, पण ते अनन्यसाधारण असावेत. अशा कथांचा शोध घेणे आजच्या काळात कठीण आहे. कारण सिनेमाची १०० वर्षांपासून निर्मिती होती आहे. ज्यावर चित्रपट बनला नाही, असा विषयच शिल्लक राहिला नाही. ‘थ्री इडियट्स’ची कथादेखील युनिक होती. तसेच ‘लगे रहो मुन्नाभाई’ची कथाही अनन्यसाधारण होती. हॉलीवूडमध्येही असा चित्रपट बनला नाही. तशीच कथा ‘पीके’ची आहे. ज्याने कधीच जीवन पाहिले नाही, असे त्यात पात्र आहे. पहिले एक वर्ष कथा लिहिली तेव्हा कळाले की, ‘इन्सेप्शन’ (हॉलीवूड) चित्रपटाचीदेखील हीच कथा आहे. चोरी केल्याचा आरोप लागू नये म्हणून संहिता नव्याने लिहिली. चित्रपट तयार आहे, पण प्रेक्षकांना कितपत आवडतो, हे पाहावे लागेल. यशाबाबत बोलायचे झाल्यास नेहमीप्रमाणे यालाही यश मिळो, हीच अपेक्षा.
चित्रपटाबाबत एवढी गोपनीयता का ठेवता?
कायबघायचे आहे, हे प्रेक्षकांना कळता कामा नये आणि अचानकपणे पात्र आणि कथा प्रेक्षकांसमोर आणावी, असे आम्ही सुरुवातीपासूनच ठरवले होते. जेणेकरून प्रेक्षक एंजॉय करू शकतील. काही दिवसांपूर्वी आमिरच्या पात्राबाबतही वृत्त प्रकाशित झाले, पण आम्ही गोपनीयता कायम ठेवली.
- एका चित्रपटावर बरीच वर्षे काम करत असल्याबद्दल.
आपण स्पर्धेत आहोत असे आम्ही कधीच विचार करत नाही. जर चित्रपटावर तुमचा विश्वास नसेल, तर तुम्ही त्या चित्रपटावर कसे काम करणार? असे चित्रपट बनवून दु:खच होईल. एकदा पैसे कमवले तर ते खर्च करायचेच आहेत. यापेक्षा उत्कृष्ट काम करणे कधीही चांगले. सातच चित्रपट बनवले, पण ते दर्जेदार बनवल्याचे मला समाधान वाटते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा राजकुमार हिराणी काय म्हणालेत...?