आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Interview: वरुणला रिअल लाइफमध्ये हवी आलियासारखी दुल्हन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आलिया भट्ट आणि वरुण धवनने घेतलेले सेल्फी
वडील डेविड धवन आणि भाऊ रोहितप्रमाणे दिग्दर्शक बनवण्याऐवजी वरुणने सांगितली अभिनयाच्या जगात येणारी प्रेरणा...
पुढील आठवड्यात शुक्रवारी (11 जुलै) रिलीज होणा-या 'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया'मध्ये आलिया भट्ट् आणि वरुण धवन यांची जोडी दुस-यांदा रुपेरी पडद्यावर झळकत आहे. 'स्टुडेंट ऑफ द इअर' सिनेमामधून बॉलिवूडमध्ये एंट्री करणारे हे नवोदित स्टार्स पुन्हा एकदा आपला जलवा दाखवण्यासाठी सज्ज आहेत. आपल्या नवीन सिनमेमाला ते शाहरुख आणि काजोल अभिनीत 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे'ला आधुनिक ट्रिब्यूट सांगतात. दोन हिट सिनेमे दिल्यानंतर वरुणसाठी प्रेक्षकांना थिएटरपर्यंत आणणे एक आव्हान ठरणार आहे.
आतापर्यंतच्या झलक, ट्रेलर्स आणि गाण्यांनी सिनेमाकडे आकर्षण वाढल्याचे दिसून येते. अभिनयाच्या बाबतीतसुध्दा हा सिनेमा वरुणला नवीन रुपात स्थापित करू शकतो. सिनेमाची गाणी 'समझावा अनप्लग्ड'च्या शेवटी त्याचे हमसाहमशी रडण्याच्या दृश्यावरून याचा अंदाजा लावला जाऊ शकतो. या सिनेमाच्या निमित्ताने वरुणची गाठ पडली. तेव्हा त्याच्याशी झालेली बातचीत...
आतापर्यंतच्या दुल्हनच्या संकल्पनेवर बनलेल्या सिनेमांपैकी कोणता आवडता सिनेमा आहे?
दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे. मी हा सिनेमा 100 वेळेस बघितला आहे.
तुझ्यासाठी कशी दुल्हन हवीये?
आलियाच्या पात्रासारखी. प्रोजेक्टिव्ह आणि महत्वकांक्षी. सुंदर आणि मनाने चांगली हवी.
आलियासह तुझी केमिस्ट्री कशी आहे?
फक्त मैत्री आहे. आमच्यात लव्ह-हेटचे नाते आहे. आम्ही खूप भांडण करतो. हा आमचा एकत्र दुसरा सिनेमा असल्याने एकमेकांना चांगले ओळखतो. 'स्टुडेंट ऑफ द इअर'पासून आतापर्यंत आलियामध्ये खूप बदल झाला आहे. ती आता उत्कृष्ट अभिनेत्री झाली आहे.
'मी खूप सिनेमे बघतो. जिम कैरी आणि बेन स्टिलरसारखे हॉलिवूड कलाकारांची स्टँडअप कॉमेडी मला खूप आवडते. त्यांचे लाइव्ह परफॉर्मन्स बघितल्यानंतर मला वाटायचे मीही असेच करावे. हळू-हळू मी त्याचे क्लासेस जॉइन केल्यानंतर मला ड्रामा आणि गंभीर भूमिकेविषयी जाणीव व्हायला लागली. तेव्हा मला समजले मी अभिनयात जाऊ शकतो.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि वाचा पूर्ण मुलाखत आणि काय-काय म्हणाला वरुण...?