आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'यलो' ही एक सुखद संधी : आर. जे. शोनाली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - रूपेरी पडद्यावर काही क्षणापुरते का असेना झळकू, असा विचार स्वप्नातही केला नव्हता. रेडिओ आर. जे. म्हणून माझे काम संपूर्ण श्रद्धा आणि निष्ठेने करत राहिले. यातूनच 'यलो'ची संधी चालत आली, असे मत आर. जे. शोनाली हिने व्यक्त केले. ही तरुणी औरंगाबादेतील आहे. अतिशय सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेल्या या मुलीच्या करिअरमध्ये अनेक वळणे आली, त्यातून तिला उत्तम संधी मिळत गेल्या. तिचा आजवरचा प्रवास तिच्याच शब्दांत..
औरंगाबादेत शिक्षण पूर्ण केल्यानंतर दैनिकात उपसंपादक म्हणून काम सुरू केले. मात्र, आठच दिवसांत हे आपले काम नाही याची प्रकर्षाने जाणीव झाली. ही जाणीव होताक्षणी तत्काळ काम सोडले. औरंगाबाद आकाशवाणीमध्ये कार्यरत असताना विवाह झाला. आर. जे. चे काम जमेल याची मला व माझ्या नवर्‍याला (रोहन) जाणीव होती. एस. एफ. एम. म्हणजे सध्याचे रेड एफ. एम. हे स्टेशनची औरंगाबादेतील मी पहिली आर. जे. होते. त्यानंतर पुण्याच्या रेडिओ सिटीत काम केले. तेथे माझा स्टार कट्टा शो लोकप्रिय झाला. पुढे 'वीर मराठा'च्या अँकरिंगचे काम यातूनच मिळाले. मग मिफ्टा अवॉर्डसाठी मला कंपनीने सिंगापूरला पाठवले. अलीकडेच 'कॅम्पस कट्टा' चित्रपटाच्या म्युझिक लाँचचे समारंभाचे निवेदन मी केले. 'यलो' चित्रपटात संधी मिळाली. विरारच्या स्वीमिंग टँकवर झालेले हे चित्रीकरण अविस्मरणीय ठरले. आई कल्पना जोशी, सासू नीला रानडे यांनी नेहमीच साथ दिली.