आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, कुणामुळे राणीच्या आयुष्यात आला आदित्य आणि झाले लग्न

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो : राणी मुखर्जी)
मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जीचे याचवर्षी यशराज बॅनरचा सर्वेसर्वा आदित्य चोप्रासह लग्न झाले. लग्नानंतर राणीच्या आयुष्यात बरेच बदल घडून आले आहेत. ती स्वतःला पत्नी, सून आणि वहिनीच्या भूमिकेत अॅडजस्ट करत आहे.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला राणीने लग्नानंतरचे शेअर केलेले अनुभव सांगत आहोत...
सासूबाई पामेलासह तुझे नाते कसे आहे? पामेला यांच्यासह तुझी पहिली भेट कधी आणि कशी झाली होती?
- मी यशराज बॅनरच्या 'मुझसे दोस्ती करोगे' या सिनेमात काम करत होते. या सिनेमाच्या शूटिंगसाठी आम्ही स्वित्झर्लंडला गेलो होतो. पामेला आंटी त्यावेळी जेवण आणि इतर गोष्टींकडे लक्ष देत होत्या. त्या माझ्या जवळ आल्या आणि बेटा तुला काय खायला आवडेल? असा प्रश्न विचारला. मी म्हटले, आंटी मी पोळी खात नाही, तुम्ही माझ्यासाठी भात बनवायला सांगाल का. त्याकाळात त्यांनी माझी बरीच काळजी घेतली आणि दररोज माझ्या जेवणात भात असेल याकडे जातीने लक्ष दिले. आता तर मी त्यांची सून आहे. त्यामुळे आमचे नाते अधिकच घनिष्ट झाले आहे. आम्ही एकत्र बसून तासन्तास गप्पा मारतो. त्या मला त्यांच्या आणि यश अंकलच्या लव्हस्टोरीविषयी आणि आदिच्या बालपणाविषयीच्या आठवणी सांगत असतात.
मी जेव्हाही त्यांना सासूच्या रुपात बघते, तेव्हा माझे त्यांच्यावरील प्रेम अधिक वाढतच जाते. त्यांच्यामुळेच आदित्य या जगात आला. हीच गोष्ट मला त्यांच्यावर पूर्वीपेक्षा जास्त प्रेम करायला लावते. आदित्य माझ्या आयुष्यात आहे, तो माझा पती आहे, हे फक्त त्यांच्यामुळेच. सासूसोबत माझे नाते काहीसे असे आहे.
पुढील स्लाईड्समध्ये वाचा, आणखी काय म्हणाली राणी...