आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Interview: प्रियांका-दीपिकापेक्षा रणवीरला तयार होण्यास जास्त वेळ लागतो

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- रणवीर सिंह)
अभिनेता रणवीर सिंह एकमेव असा अभिनेता आहे, जो नेहमीच मस्तीच्या मूडमध्ये असतो. तो ज्या पार्टीत जातो, सर्वांचे लक्ष आपल्याकडे आकर्षित करतो. त्याचे इव्हेंटशी नाते असो अथवा नसो, तो ज्यांना भेटतो त्यांना आपल्या गोड-गोड बोलण्याने भारावून टाकतो. एक अभिनेता म्हणून त्याच्यात काही नाहीये. त्याने 'लुटेरा'सारखे उत्कृष्ट सिनेमेसुध्दा केले. 2010मध्ये 'बँड बाजा बारात'मधून पदार्पण केल्यानंतर तो संजय लीला भन्साळी यांच्या 'रामलीला' आणि
'बाजीराव मस्तानी' सिनेमाचा हीरो झाला आहे.
रणवीरने divyamarathi.comशी बातचीत केली. त्यावेळी रणवीरने सांगितले, की त्याला सिनेमाच्या शूटिंगसाठी तयार होण्यासाठी प्रियांका चोप्रा आणि दीपिका पदुकोणपेक्षा जास्त वेळ लागतो. रणवीर दिग्दर्शिका जोया अख्तरच्या 'दिल धडकने दो' सिनेमातसुध्दा दिसणार आहे. शाद अलीचा 'किल दिल' येत्या 14 नोव्हेंबर रोजी रिलीज होत आहे. त्यामध्ये गोविंदा, परिणीती चोप्रा आणि अली जफरसह रणवीरसुध्दा मुख्य भूमिकेत आहे. या सिनेमानिमित्त रणवीरशी भेट झाली. त्याने आपल्याविषयी मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्याचे काही अंश तुमच्यासाठी...
ख-या आयुष्यात तू अशीच स्टाइल बदलत असतो का?
शाद अलीने मला थोडे वजन वाढवण्यास सांगितले. 'गुंडे' आणि '...रामलीला'मध्ये मला खूप मजबूत दिसायचे होते. परंतु 'किल दिल'मध्ये माझा स्वीट चेहरा त्यांना दाखवायचा होता. मी शेव्हिंग केले आणि केस कापले. तुम्ही माझे निरिक्षण केले तर दिसेल, की माझे गाल गोल-गोल दिसत आहे. माझ्या या पात्रात बालीशपणा आहे. त्याची कोणतीही फिलॉसॉपी नाहीये. तो आपल्या भावाचे ऐकून सर्व कामे करतो. त्यानंतर त्याच्या आयुष्यात परिणीती येते आणि सर्वकाही बदलते.
"गोविंदाला पाहून मी हा सिनेमा निवडला. तो गतकाळातील प्रसिध्द आणि उत्कृष्ट अभिनेता आहे. तो तयारी करून येत नाही. सेटवर आल्यानंतर सीन आणि दृश्याविषयी विचारतो. एकाच टेकमध्ये सीन ओके करतो."
"राजू हिराणीशिवाय जोया अख्तरसुध्दा उत्कृष्ट दिग्दर्शिका आहे. 'दिल धडकने दो'दरम्यान मी पटकथा वाचली आणि तेव्हाच लक्षात आले, की जोयाचा हा सिनेमा खूप चांगला बनेल."
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा रणवीरची पूर्ण मुलाखत...