आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Interview: 'माधुरी दीक्षितची फॅन आहे, म्हणून बार्बीची मनारा झाले'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अभिनेत्री मनारा)
मुंबई: येत्या शुक्रवारी (28 नोव्हेंबर) बॉक्स ऑफिसवर 'जिद' सिनेमा झळकणार आहे. या सिनेमामधून नवोदित अभिनेत्री मनारा पदार्पण करत आहे. मनाराचे वैशिष्ट असे, की ती प्रियांका आणि परिणीती चोप्रा यांनी कजिन आहे. 'जिद'मध्ये तिने अनेक बोल्ड सीन्स दिले, त्यामुळे ती चांगलीच चर्चेत आली आहे. divyamarathi.comने मनारा आणि सिनेमाचा निर्माता अनुभव सिन्हा यांच्याशी खास बातचीत केली. मनाराने सिनेमा आणि पर्सनल लाइफविषयी अनेक गोष्टी शेअर केल्या.
मनारासोबत झालेल्या बातचीतचे काही अंश...
प्रश्न- तुला मनारा म्हणावे, की बार्बी? अथवा दुसरे एखादे नाव आहे?
उत्तर- तुम्ही मला मनारा म्हणा. तसे पाहता माझ्या पात्राचे नाव माया आहे, त्यामुळे तुम्ही मला माया म्हणू शकता. (अनुभव सिन्हा हसून म्हणाले) येथे कुणी बार्बी हांडा नाहीये.
प्रश्न- बार्बी हांडाने ते मनारा बनण्याचे काही खास कारण?
उत्तर- सिनेमात येण्यापूर्वी बार्बी हांडा नाव चांगले नव्हते. अनुभव सिन्हा यांनी मला एम (M)वरून एखादे नाव ठेवण्यास सांगितले. मी माधुरी दीक्षितची चाहती आहे. मला त्यांचा 'हम आपके है कौन', 'दिल तो पागल है'सारखे सिनेमे आवडतात. त्यामुळे त्यांच्या नावाच्या पहिल्या अक्षरापासून (Mपासून) सुरु होणारे नाव मी ठेवले. हे नाव ग्रीक भाषेतील आहे. त्याचा अर्थ समथिंग दॅट साइन (Something That Shine) असा आहे.
प्रश्न- 'जिद' का निवडला. या सिनेमातील तुझे पात्र कसे आहे?
उत्तर- पहिल्याच सिनेमात मला अनुभव सिन्हासोबत काम करण्याची संधी मिळाली. म्हणून मी 'जिद' निवडला. सिनेमात माझे पात्राचे नाव माया आहे, ती पाऊस पाहून आनंदी होते. तिला बॉयफ्रेंडसोबत राहायला आवडते. सिनेमाचे शूटिंग गोव्यात झाले आहे. तिथे पावसाचे शॉट करण्यात खूप मजा आली.
प्रश्न- सिनेमात तू खूप बोल्ड दिसली आहेस? पटकथेची डिमांड होती की सिनेमा चर्चेत ठेवण्यासाठी सीन दिले?
उत्तर- सिनेमात अशा सीन्सची डिमांड होती. असे नाही, की पब्लिसिटी मिळवण्यासाठी असे केले. परंतु तुम्ही हा सिनेमा पाहिल्यास तुम्हाला आवडले, हे नक्की.
प्रश्न- इंडस्ट्रीमध्ये आलिया भट्ट, श्रध्दा कपूरसारख्या नवोदित अभिनेत्री आहेत. सोबतच, तुझ्या बहिणीदेखील काम करत आहेत. कोणाकडून जास्त कॉम्पिटीशन मिळेल?
उत्तर- माझी स्पर्धा कुणासोबतच नाहीये. मी सिनेमात माझे 100 टक्के दिले आहेत. आता प्रेक्षकांना ठरवायचे आहे, ती माझे काम कसे आहे. मी कुणासोबत स्पर्धा करण्यासाठी आलेली नाहीये. मी तर प्रियांका चोप्राला उत्कृष्ट अभिनेत्री मानते.
प्रश्न- प्रियांकाचा कोणता सिनेमा आवडतो?
उत्तर- प्रियांकाने 'बर्फी', 'बरसात', 'मेरी कॉम'मध्ये शानदार अभिनय केला आहे. हा सिनेमा मला खूप आवडतो.
प्रश्न- सिनेमांत कशी आलीस? बहिणींकडे पाहून आलीस?
उत्तर- मी दिल्लीची रहिवासी आहे आणि मला फॅशन डिझाइनर होण्याची इच्छा होती. नंतर मला काही लोकांनी सल्ला दिला, की मी कोरिओग्राफर बनावे आणि मी छोटी बॅग घेऊन मुंबईला रवाना झाले.
प्रश्न- सिनेमांत काम केले नसते तर काय केले असते?
उत्तर- मला सुरुवातीपासूनच काहीतरी क्रिएटीव्ह काम करण्याची इच्छा होती. मला पेंटींग, डान्सिग, फॅशन डिझाइनिंग, सिंगिंगची आवड आहे. जर सिनेमांत आले नसते तर यातील एखादे क्षेत्र निवडले असते. जे काही केले असते, ते क्रिएटीव्ह असते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा अनुभव सिन्हा काय म्हणाले...?