आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Birthday Special : Intresting Facts About Rajesh Khanna

FACTS: तरुणींच्या KISSने गुलाबी होऊन जायची राजेश खन्ना यांची पांढ-या रंगाची कार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः राजेश खन्ना)
मुंबईः बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना आज आपल्यात नाहीत. मात्र ते हयात असते तर आज 72 वर्षांचे झाले असते. त्यांचा जन्म 1942मध्ये झाला होता.1966मध्ये रिलीज झालेल्या 'आखिरी खत' या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणा-या राजेश खन्ना यांनी जवळजवळ 180 सिनेमांमध्ये अभिनय केला. याकाळात ते 14 वेळा फिल्मफेअर पुरस्कारांसाठी नामांकित झाले तर तीनदा त्यांनी हा पुरस्कार आपल्या नावी केला. तसे पाहता राजेश खन्ना यांच्याविषयी बरेच काही त्यांच्या चाहत्यांना ठाऊक आहे. मात्र आम्ही तुम्हाला त्यांच्या आयुष्यातील काही असे फॅक्ट्स सांगत आहोत, ज्याविषयी त्यांचे चाहते अज्ञात आहेत. divyamarathi.com तुम्हाला सांगत आहेत, काकांच्या आयुष्यातील असेच काही FACTS:
1) बॉलिवूड अभिनेते जितेंद्र आणि राजेश खन्ना एकाच शाळेत शिकले.
2) बॉलिवूडमध्ये राजेश खन्ना यांची निवड एका टॅलेंट हंट शोच्या माध्यमातून झाली होती. 1965 मध्ये युनायटेड प्रोड्युसर्स आणि फिल्मफेअरच्यावतीने एका टॅलेंट हंटचे आयोजन करण्यात आले होते. ते एका नवोदित अभिनेत्याच्या शोधात होते. या स्पर्धेत दहा हजारांपैकी आठ हजार तरुणांची निवड झाली होती. त्यापैकी एक राजेश खन्ना होते. अखेर या स्पर्धेचे विजेते राजेश खन्ना ठरले होते.
3) राजेश खन्ना यांच खरे नाव जतिन खन्ना आहे. राजेशजींनी त्यांच्या काकांच्या म्हणण्यावरून नाव बदलले होते.
4) तरुणींमध्ये राजेश खन्ना प्रचंड लोकप्रिय होते. त्यांच्या प्रेमात काही तरुणींनी त्यांना रक्ताने पत्र लिहले होते. काही तरुणींनी तर त्यांच्या फोटोसोबत लग्न केले होते. अनेक तरुणी त्यांचे फोटो आपल्या उशीखाली ठेवायच्या, तर काहींनी त्यांचे नाव आपल्या हातावर गोंदवून घेतले होते.
5) एखाद्या स्टुडिओ किंवा निर्मात्याच्या ऑफिसबाहेर राजेश खन्ना यांची पांढरी कार उभी असल्यास तरुणी त्या कारचे चुंबन घ्यायच्या. लिपस्टिकमुळे त्यांची पांढ-या रंगाची कार गुलाबी होत असे.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या काकांच्या आयुष्याशी निगडीत आणखी काही फॅक्ट्स...