(अभिनेत्री श्वेता बसु प्रसाद)
मुंबई: 2002मध्ये प्रदर्शित झालेला शबाना आजमीच्या 'मकडी' सिनेमात छोट्या मुलीचे पात्र साकारणारी श्वेता बसू प्रसाद आजही अनेकांना आठवत असेल. सिनेमातील शानदार अभिनयासाठी तिला बालकलाकारचा नॅशनल अवॉर्ड मिळाला होता. या सिनेमानंतर श्वेता 'कहानी घर घर की' आणि 'करिश्मा' या टीव्ही मालिकांमध्ये दिसली होती. आता बातमी अशी आहे, की श्वेताला पोलिसांनी सेक्स रॅकेटशी संबंधित असल्यामुळे अटक केली आहे.
'इकबाल' आणि 'डरना जरूरी है'सारख्या सिनेमांत काम केलेल्या श्वेताने दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीकडे कल दाखवला होता. तिच श्वेता रविवारी (31 ऑगस्ट) हैदराबाद पोलिसांनी शहरातील बंजारा हिल्स परिसरात रेप्युटेड हॉटेल्समध्ये धाड टाकल्यानंतर रंगे हात पकडल्या गेली. सूत्रांच्या सांगण्यानुसार, पोलिसांना एका व्यक्तीने हॉटेलमध्ये चालू असलेल्या सेक्स रॅकेटविषयी सांगितले होते. त्यानंतर पोलिसांनी अॅक्शन घेतली. याविषयी अधिक माहिती पोलिसांच्या तपासानंतर समोर येऊ शकते.
श्वेता पहिल्यांदाच अशा प्रकरणात अडकलेली नसून यापूर्वीसुध्दा ती अनेकदा वादात फसली आहे. यापूर्वी एका तेलगू चॅनलच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये श्वेता दिसली होती.
या प्रकरणावर श्वेताने सांगितले, 'मी माझ्या करिअरमध्ये चुकिचा पर्याय शोधल्याने मला पैशांची कमतरता भासत आहे. मला माझ्या कुटुंबाला पैसे पुरवावे लागतात. सर्व दार माझ्यासाठी बंद झाले तर काही लोकांनी मला या कामाची कल्पना दिली. मला मदत करणारे कुणी नव्हते. मला हे काम करण्याशिवाय पर्याय नव्हता. इंडस्ट्रीमध्ये अनेक अभिनेत्री आहेत, ज्या माझ्यासारख्या पैशाच्या कमतरतेने त्रस्त आहेत.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा श्वेता बसु प्रसादची काही छायाचित्रे...