[फाइल फोटो : इराकी पत्रकार मुंतधर अल जैदीसह निर्माता-दिग्दर्शक महेश भट्ट]
मुंबई - इराकी पत्रकार मुंतधर अल जैदीने दहशतवाद्यांनी कैद करुन ठेवलेल्या 40 भारतीयांची सुटका करण्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. यासंदर्भात मुंतधर अल जैदीने निर्माता-दिग्दर्शक महेश भट्ट आणि अभिनेता इमरान जाहिद यांच्याशी संपर्क साधला असून म्हटले, की भारत सरकारची इच्छा असल्यास तो भारताच्यावतीने दहशतवाद्यांशी बोलणी करु शकतो.
''मी कैदेत असलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी इराकला जाण्याच्या तयारीत आहे. फक्त भारत सरकारच्यावतीने पॉवर ऑफ अॅटर्नीची प्रतिक्षा करत आहे. मी त्यांच्या सुटकेसाठी शक्य तितके सर्व प्रयत्न करेल. मी आशा व्यक्त करतो, सर्वकाही लवकरच ठिक होईल आणि ते आपल्या घरी सुखरुप परत येतील.'' - मुंतधर अली जैदी
मुंतधरच्या या प्रस्तावाविषयी अभिनेता इमरानने जाहिदने सांगितले, "मुंतधर आणि त्याची पत्नी माझ्या आणि महेश साहेबांच्या संपर्कात आहे. भारतीयांच्या सुटकेसाठी दहशतवाद्यांशी बोलणी करण्याची त्याची इच्छा आहे. मुंतधरची पत्रकारिता संपूर्ण इराक आणि मिडल ईस्टमध्ये चर्चेत आहे. आम्ही त्याला स्पष्ट सांगितले, की तो भारत सरकारच्यावतीने दहशतवाद्यांशी बोलणी करु शकतो."
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या मुंतधरच्या प्रस्तावाविषयी काय आहे भट्ट साहेबांची प्रतिक्रिया आणि कोण आहे मुंतधर अली जैदी...