आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मीराच्या आणखी एका चित्रपटात दिसणार इरफान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडमधील उत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक अभिनेता इरफान खान पुन्हा एकदा मीरा नायरसोबत काम करणार आहे. 2006 मध्ये या दोघांनी 'नेमसेक' चित्रपटात एकत्र काम केले होते. मीरा नायर चित्रपटाची दिग्दर्शिका होती तर इरफानने तब्बूसोबत प्रमुख भूमिका साकारली होती. तेव्हापासूनच या दोघांमध्ये जवळचे नाते तयार झाले. आपल्या प्रत्येक चित्रपटाचा प्रस्ताव मीरा इरफानला देते.
गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या 'द रिलेक्टेंट फंडामेंटलिस्ट' मध्ये प्रमुख भूमिका करण्याचा प्रस्ताव तिने इरफानला दिला होता.
आता हे दोघे पुन्हा एकदा 'द बंगाली डिटेक्टिव्ह' मध्ये काम करणार आहेत. मीराच्या मागच्या चित्रपटातदेखील इरफानची बंगाली भूमिका होती. मात्र, या चित्रपटात त्याला डांस करावा लागणार आहे, जो त्याला येत नाही. या कामी जाहिरातपटकार पीयूष पांडे इरफानची मदत करणार आहेत. इरफानने सांगितले की, 'मीराला मला डांस करता येतो की नाही हे पाहायचे आहे. पीयूषच्या एका जाहिरातीत माझा डांस आहे. ही जाहिरात मी मीराकडे देखील पाठवणार आहे.'